वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा, 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:07 PM2022-04-20T15:07:04+5:302022-04-20T15:08:19+5:30

How To Reduce Electricity Bill : जर तुम्हीही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

reduce electricity bill by 50 percent follow these tips and tricks | वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा, 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल खर्च

वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा, 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल खर्च

googlenewsNext

नवी दिल्ली : उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपापल्या घरात एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. एसी आणि कुलर जास्त चालत असल्याने अचानक वीज बिलात वाढ होत आहे. या महागाईच्या जमान्यात जनता यामुळे त्रस्त झाली आहे. जर तुम्हीही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही वीज बिल कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पद्धतीने तुम्ही वीज बिल 50 टक्के टक्क्यांनी कमी करू शकता...

1. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रेटिंग विचारात घ्या..
देशात स्मार्ट इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा कल झपाट्याने वाढत आहे. आजकाल ग्राहक कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे रेटिंग तपासतात. या रेटिंगचा अर्थ आहे की तुमचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन किती कमी वीज वापरते. 5 स्टार रेटिंग असलेल्या उत्पादनांद्वारे सर्वात कमी वीज वापर केला जातो. अशा परिस्थितीत, जास्तीत जास्त रेटिंगसह उत्पादने खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

2. एसीचे तापमान इतके ठेवा
जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल तर तुमच्या एसीचे तापमान 24 डिग्रीवर ठेवावे. आजच्या काळात विंडो एसी (Window AC) असो की स्प्लिट एसी (Split AC) बहुतेकांचा वापर सुरू झाला आहे. 24 डिग्री तापमानात अशाप्रकारे चालवून, आपण दीर्घकाळ कमी वीज वापरून कूलिंग होण्याचा फायदा घेऊ शकता.

3. दिवसा लाइट बंद ठेवा
जर दिवसा तुमच्या घरात सुर्याचा प्रकाश येत असेल तर अशा वेळी लाईट बंद ठेवा. याद्वारे तुम्ही वीज बिलात कपात करू शकता. तसेच घरातील प्रत्येक खोलीत एलईडी बल्ब लावावेत. यामुळे बिलातही सुमारे 50 टक्के कपात होईल. तुम्ही वापरत नसलेले इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स बंद करून ठेवा. 
 

Web Title: reduce electricity bill by 50 percent follow these tips and tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.