दिवंगत पत्नीच्या आठवणींसाठी वृद्धाचा घर सोडायला नकार

By admin | Published: July 3, 2017 12:44 AM2017-07-03T00:44:01+5:302017-07-03T00:44:01+5:30

पन्नास वर्षांपासून राहात असलेले घर सोडायला हट्टी सेवानिवृत्त मायकेल क्रॉसमन (७५) यांनी नकार दिला आहे. क्रॉसमन ज्या ठिकाणी राहतात

Refuse to leave the old man's house for the memories of a deceased wife | दिवंगत पत्नीच्या आठवणींसाठी वृद्धाचा घर सोडायला नकार

दिवंगत पत्नीच्या आठवणींसाठी वृद्धाचा घर सोडायला नकार

Next

लंडन : पन्नास वर्षांपासून राहात असलेले घर सोडायला हट्टी सेवानिवृत्त मायकेल क्रॉसमन (७५) यांनी नकार दिला आहे. क्रॉसमन ज्या ठिकाणी राहतात तेथील त्यांच्या सगळ््या शेजाऱ्यांनी घरे सोडली आहेत. १९६० मध्ये बांधलेले हे घर सोडून जा, असे अनेकवेळा गेट्सशेड कॉन्सिलने त्यांना म्हटले. कॉन्सिलला ही घरे पाडून नवी बांधायची आहेत.
दोन बेडरूमचे येथे २५८ फ्लॅट्स पुन्हा बांधून तयार झाले आहेत. क्रॉसमन यांनी कोणताही संघर्ष न करता घर रिकामे करायला नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे असे की,‘‘मी हा फ्लॅट विकत घेतला असून माझी दिवंगत पत्नी मेरी हिच्या आठवणींनी तो भरून गेला आहे. कॉन्सिल जी रक्कम देत आहे त्यातून
दुसरीकडे मला घर मिळणार नाही.’’ तीन वर्षांपूर्वी मेरी क्रॉसमन यांचे निधन झाले. कॉन्सिलने क्रॉसमनना ६२,५०० पौंड देऊ केले आहेत. ‘‘मला हे घर सोडायला काही अडचण नाही. परंतु मेरीच्या आठवणी मागे ठेवून घर सोडणे वाईट ठरेल. हे तिचे घर होते. येथील प्रत्येक गोष्ट तिने निवडलेली होती,’’ असे मायकेल क्रॉसमन म्हणाले. मला हे घर सोडायचे नाही परंतु ते सोडावे लागेल हेही खरे. पण जो पैसा दिला जात आहे त्यात दुसरीकडे घर मिळणार नाही, असे क्रॉसमन म्हणाले.

Web Title: Refuse to leave the old man's house for the memories of a deceased wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.