बेस्ट फ्रेन्डला आधार देणं महिलेला पडलं महागात, पतीसोबत जे केलं त्यामुळे चिंतेत पडली मैत्रीण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:59 PM2022-04-29T14:59:15+5:302022-04-29T15:00:25+5:30
Relationship : महिलेने सांगितलं की, माझं आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डचं वय ३१ वर्षे आहे. आम्ही यूनिव्हर्सिटीपासून सोबत आहोत. आता आम्ही एकाच कंपनीत सोबत काम करतो.
Relationship : कोणत्याही व्यक्तीसाठी मैत्री ही महत्वाची असतेच. मित्र असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे तुम्ही मनातलं सगळं व्यक्त करू शकता. मैत्रीत तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरून जज केलं जात नाही. पण जर तुमचा मित्रच तुमच्या प्रेमावर नजर टाकत असेल तर काय होईल? एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. महिलेच्या बेस्ट फ्रेन्डने असं काही कंल ज्यामुळे ती हैराण झाली. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...
महिलेने सांगितलं की, माझं आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डचं वय ३१ वर्षे आहे. आम्ही यूनिव्हर्सिटीपासून सोबत आहोत. आता आम्ही एकाच कंपनीत सोबत काम करतो. महिलेने सांगितलं की, गेला महिना माझ्या बेस्ट फ्रेन्डसाठी फार कठिण होता.
महिलेने सांगितलं की, गेल्या महिन्यात बेस्ट फ्रेन्डला समजलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे आणि आता त्याला माझ्या बेस्ट फ्रेन्डकडून घटस्फोट हवा आहे. या गोष्टीमुळे माझी मैत्रीण चिंतेत होती आणि तिचं टेंशन कमी करण्यासाठी मी तिला ऑफिस पार्टीसाठी बोलवलं.
पार्टी दरम्यान ती माझ्या पतीसोबत डान्स करत होती आणि आनंदी दिसत होती. पण थोड्या वेळाने मी पाहिलं की, ती माझ्या पतीला किस करत आहे. माझ्या पतीने तिला धक्का देऊन दूर केलं. आता माझ्या डोक्यातून ते चित्र जातच नाहीये. नंतर माझ्या बेस्ट फ्रेन्डने मला माफी मागितली. पण नाही वाटत की, मी तिला कधी माफ करू शकेल. महिला म्हणाली की, मला माझी १३ वर्षांची मैत्री संपवायची नाहीये. पण तिच्या या वागण्याचा मला खूप राग आला आहे.
एक्सपर्ट म्हणाले की, फार कमी लोक असतात ज्यांची इतकी वर्ष जुनी मैत्री असते. हे बरोबरच आहे की, तुमच्या बेस्ट फ्रेन्डने तुमच्या पतीला किस करायचं नव्हतं. पण तुमची बेस्ट फ्रेन्ड नशेत होती आणि त्यासाठी १३ वर्ष जुनी मैत्री संपवणं योग्य होणार नाही. एक्सपर्ट म्हणाले की, तुमची बेस्ट फ्रेन्ड सध्या कठिण काळातून जात आहे. तिने तिच्या वागण्यासाठी तुमची माफीही मागितली आहे. तुम्ही तिला माफ करा आणि पुढे जा.