मृत्यूबाबत रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा, वाचा नेमकं शेवटच्या क्षणाला काय वाटतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:39 PM2020-02-04T12:39:23+5:302020-02-04T12:49:20+5:30

कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा.

Research revealed that death is a beautiful feeling | मृत्यूबाबत रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा, वाचा नेमकं शेवटच्या क्षणाला काय वाटतं!

मृत्यूबाबत रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा, वाचा नेमकं शेवटच्या क्षणाला काय वाटतं!

Next

(Image Credit : theconversation.com)

कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा. पण अशात मृत्यूबाबत एक आश्चर्यजनक बाब रिसर्चमधून समोर आली आहे. या रिसर्चनुसार, मृत्यू एक आनंद देणारा क्षण आहे आणि त्यावेळी व्यक्तीला इतका आनंद मिळतो की, त्याला पुन्हा जीवनाकडे परतण्याची इच्छा तो सोडून देतो.

काही रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, जगात असेही काही लोक आहेत ज्यांना मृत्यूच्या दारातून पुन्हा जगण्याची संधी मिळाली. जीवन संपण्याचा क्षण आणि पुन्हा जगण्याचा जुडण्याची जाणीव लोकांसाठी इतकी आनंददायी असते की, ती भावना व्यक्त करण्याच्या स्थितीत व्यक्ती नसते.

(Image Credit : scientificamerican.com)

Plos One नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, Artificial Intelligenceचा वापर करत १५८ अशा घटनांचं बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. या अशा लोकांकडून लिहिलेल्या घटना होत्या, ज्यांनी मृत्यूचा क्षणभरासाठी अनुभव केला होता.

(Image Credit : independent.co.uk)

या लोकांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये 'बघणे' आणि 'प्रकाश' अशा शब्दांचा वापर पुन्हा पुन्हा करण्यात आला होता. आणि भिती व मृत अशा शब्दांचा वापर फार कमी करण्यात आला होता. कॅनडातील वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि बेल्जिअमच्या युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनुसार, त्यांच्या निष्कर्षातून असे पुरावे मिळाले आहेत ज्यात मृत्यूच्या फार जवळ पोहोचलेल्या लोकांनी सांगितले की, त्यावेळी त्यांची भावना तशी नव्हती जशी जगताना असते.

रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॅनेडिअन पॅरामेडिकल टीमचे एक सदस्य एडम टीप यांना जेव्हा विजेचा झटका बसला होता तेव्हा ते ११ मिनिटांसाठी मृत झाले होते. पण जेव्हा ते पुन्हा जिंवत झाले तेव्हा त्यांनी त्या क्षणाबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते की, तो अनुभव असा होता की, जणू मी एखाद्या ओळखीच्या जागेवर गाढ झोपेतून जागा झालोय आणि मला कशाचीही भिती वाटत नव्हती. मनात शांतताच शांतता होती आणि आनंदाची भावना होती.

या रिसर्चमध्ये अशा घटनांमधून गेलेल्या लोकांना असे प्रश्न विचारण्यात आले होते की, तुम्हाला त्यावेळी आनंद किंवा शांतता वाटत होती का? आणि तुम्हाला शरीरातून मुक्त झाल्याचं काही जाणवलं का? त्यावेळी मनात काय भावना होती? 

 


Web Title: Research revealed that death is a beautiful feeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.