Jara Hatke: समुद्राच्या तळाला सापडले १२०० वर्षे जुने शहर, संशोधकाने केला धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:34 PM2022-03-06T20:34:35+5:302022-03-06T20:35:22+5:30

Jara Hatke: एका माजी आर्किटेक्टने पाण्याखाली १२०० वर्षे जुने शहर शोधल्याचा दावा केला आहे. या अमेरिकन आर्किटेक्टचे नाव क्रॅकपॉट जॉर्ज गेले असे आहे. त्यांनी मेक्सिकोच्या आखातामध्ये Chandleur Islands वर पाण्याखाली एका प्राचीन शहराचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे.

Researcher makes shocking claim to find 1,200-year-old city at sea | Jara Hatke: समुद्राच्या तळाला सापडले १२०० वर्षे जुने शहर, संशोधकाने केला धक्कादायक दावा

Jara Hatke: समुद्राच्या तळाला सापडले १२०० वर्षे जुने शहर, संशोधकाने केला धक्कादायक दावा

googlenewsNext

न्यूयॉर्क -  एका माजी आर्किटेक्टने पाण्याखाली १२०० वर्षे जुने शहर शोधल्याचा दावा केला आहे. या अमेरिकन आर्किटेक्टचे नाव क्रॅकपॉट जॉर्ज गेले असे आहे. त्यांनी मेक्सिकोच्या आखातामध्ये Chandleur Islands वर पाण्याखाली एका प्राचीन शहराचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे. गेले यांनी सांगितले की, समुद्रतळाशी जे दगड सापडले आहेत ते प्राचीन शहरामध्ये बांधलेल्या इमारतींचे आहेत.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार जॉर्ज गेले हे सुमारे ५० वर्षांपासून प्रमुख इमारतींच्या अवशेषांचे आणि मोठ्या पिरॅमिडचे अध्ययन करत आहेत. तसेच हल्लीच ते होडीतून समुद्रामध्ये गेले होते तेव्हा त्यांना १२०० वर्षे जुने ग्रॅनाईटचे शहर सापडल्याचा दावा त्यांनी केला. हे क्षेत्र स्थानिक भागात चर्चेचा विषय ठरलेले आहे. त्याचं कारण म्हणजे येथील मच्छिमार हे त्यांच्या जाळ्यामध्ये विशिष्ट्य प्रकारचे दगड सापडत असल्याची माहिती देत असतात.

दरम्यान, पाण्यामध्ये एवढ्या मोठ्या ग्रॅनाईटच्या दगडांची रचना कशी निर्माण झाली, असा प्रश्न पडत आहे. गेले यांच्याकडे या पिरॅमिडची रचना आणि त्यांच्या वयाबाबत अनेक रंजक तर्क आहेत. मात्र त्यांच्या या दाव्यांकडे तज्ज्ञ संशयाच्या नजरेतून पाहत आहेत.  

Web Title: Researcher makes shocking claim to find 1,200-year-old city at sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.