आता आला असा मास्क जो लावून तुम्ही खाऊ-पिऊही शकता? बघा कसं....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 04:38 PM2021-03-25T16:38:38+5:302021-03-25T18:46:18+5:30

Nose-only Mask किंवा Eating Mask लोकांना जेवणादरम्यान सुरक्षित ठेवेल असा दावा त्यांनी केला आहे. पण यावर लोकांनी प्रश्नही उपस्थित केले.

Researchers produce nose only masks to wear while eating or drinking twitter reaction | आता आला असा मास्क जो लावून तुम्ही खाऊ-पिऊही शकता? बघा कसं....

आता आला असा मास्क जो लावून तुम्ही खाऊ-पिऊही शकता? बघा कसं....

googlenewsNext

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तरी कोरोना वॅक्सीन आल्याने लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे. पण तरी मास्क हा लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. लोक स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत मास्क घालून राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, पब्लिक प्लेसमध्ये खाण्या-पिण्याासाठी मास्क काढावाच लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी मेक्सिकोच्या वैज्ञानिकाने एक खास प्रकारचा मास्क डिझाइन केला आहे. Nose-only Mask किंवा Eating Mask लोकांना जेवणादरम्यान सुरक्षित ठेवेल असा दावा त्यांनी केला आहे. पण यावर लोकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

हा व्हिडीओ  न्यूज एजन्सी रॉयटर्सने शेअर केलाय. त्यांनी सांगितले की, मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकाने Nose Only मास्क डिझाइन केलाय. जो तुम्ही नॉर्मल मास्क खाली घालू शकता. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ५९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे आणि २३८ पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

हा मास्कही इतर मास्क सारखाच आहे. पण याने केवळ नाक कव्हर होतं. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की तोंडातून कोरोना व्हायरस शरीरात जाऊ शकत नाही का? एका यूजरने याला मूर्खपणा म्हटला आहे.

Web Title: Researchers produce nose only masks to wear while eating or drinking twitter reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.