याला म्हणतात नशीब! आजोबांच्या सांगण्यावरून घेतलं लॉटरीचं तिकीट; 18 व्या वर्षी झाली अब्जाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 10:17 AM2023-02-05T10:17:23+5:302023-02-05T10:18:17+5:30
एका 18 वर्षीय मुलीने 3 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकली आहे.
लोक आयुष्यभर लॉटरी विकत घेतात पण एक रुपयाही जिंकत नाहीत. पण एका 18 वर्षीय मुलीने पहिल्याच प्रयत्नात लॉटरी जिंकण्याचा नवा विक्रम केला आहे. लाखो लोक त्यांचे नशीब उजळण्यासाठी लॉटरीची तिकिटे खरेदी करतात. या लॉटरीतून एक दिवस करोडपती होऊ शकतो, अशी त्यांना आशा असते. पण कल्पना करा जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील पहिली लॉटरी खरेदी केली आणि ती अब्जाधीश झाली तर ते एखाद्या जादूपेक्षा कमी नाही.
कॅनडातील एका 18 वर्षीय मुलीने 3 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकली आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या इतिहासात तिने या वयात सर्वात मोठी लॉटरी जिंकण्याचा विक्रम केला आहे. कॅनडाची 18 वर्षीय ज्युलिएट लॅमॉर लॉटरी जिंकली ती जॅकपॉटची सर्वात तरुण विजेती आहे. शुक्रवारी, ज्युलिएट लॅमॉरने 48 मिलियन कॅनेडियन डॉलर्स म्हणजे 2.9 अब्ज रुपये इतकी मोठी रक्कम मिळवली. सर्वात मोठा जॅकपॉट जिंकणारी ज्युलिएट ही सर्वात तरुण कॅनेडियन नागरिक ठरली आहे.
ज्युलिएट वयाच्या 18 व्या वर्षी झाली अब्जाधीश
ज्युलिएटचे हे पहिले लॉटरीचे तिकीट होते. आता वयाच्या 18 व्या वर्षी ज्युलिएट अब्जाधीश झाली आहे. लॉटरीचे तिकीट खरेदी करणे हा निव्वळ योगायोग होता असे ज्युलिएटने सांगितले आहे. आजोबांनी तिला तिच्या 18 व्या वाढदिवशी लॉटरी खेळण्याची सूचना केली. लॉटरी कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलीकडच्या काळात कॅनडात 18 व्या वर्षी अनेक विजेते बनले आहेत. पण ज्युलिएटने जितकी रक्कम जिंकली आहे तितकी रक्कम कोणत्याही विजेत्याने जिंकलेली नाही.
कुटुंबासह सहलीची तयारी
ज्युलिएटने सांगितले की ती जिंकलेले पैसे तिच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे. ज्युलिएट एक दिवस डॉक्टर बनून तिच्या समाजाची सेवा करण्याचे स्वप्न पाहते. या पैशातून ज्युलिएट सध्या आपल्या कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत आहे. ज्युलिएटने सांगितले की जेव्हा ती तिकीट घेण्यासाठी पोहोचली तेव्हा तिने तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांची मदत घेतली. त्यानंतर ती ऑफिसमध्ये आली. लॉटरी निघताच कार्यालयात लॉटरीची चर्चा सुरू झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"