याला म्हणतात नशीब! क्लार्कच्या एका चुकीमुळे 'तो' बनला करोडपती; रातोरात बदललं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:17 AM2023-11-28T11:17:17+5:302023-11-28T11:27:05+5:30
जगातील प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. काही यासाठी मेहनत करतात, काही शक्कल लढवतात, तर अनेकजण नशिबावरही अवलंबून असतात.
पैसा ही एक अशी गोष्ट आहे जो कितीही मिळाला तरी कमीच वाटतो. जगातील प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. काही यासाठी मेहनत करतात, काही शक्कल लढवतात, तर अनेकजण नशिबावरही अवलंबून असतात. काही लोक नियमितपणे लॉटरीची तिकिटं खरेदी करतात. मात्र क्वचित प्रसंगी, कोणीतरी लॉटरी जिंकतो आणि त्याचं नशीब फळफळतं.
अमेरिकेतील इलिनोइस येथे राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत असंच काहीसं घडलं जे हैराण करणारं आहे. एका क्लार्कच्या चुकीमुळे त्याने बक्षिसाची मोठी रक्कम जिंकली आहे. मायकेल म्हणाला की, तो त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी काही आठवड्यांनी इंडियाना मार्गे मिशिगनला जातो. मिशिगन लॉटरीने दिलेल्या माहितीनुसार, तो ड्रॉसाठी लकी फॉर लाइफ तिकिट देखील खरेदी करतो.
सोपेजस्टने सांगितलं की, 17 सप्टेंबर रोजी गोलो गॅस स्टेशनवरील किरकोळ विक्रेत्याने एका ड्रॉसाठी 10 ओळींचे तिकीट चुकून छापलं होतं. हे माहीत असूनही त्याने ते विकत घेतले. त्याने लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितले की, मी जेव्हा सकाळी माझे तिकीट तपासले आणि मी माझ्या उर्वरित आयुष्यासाठी दरवर्षी 25,000 डॉलर जिंकल्याचे पाहिले, तेव्हा मी भारावून गेलो. म्हणजेच, मी एका चुकीमुळे इतकं मोठं बक्षीस जिंकलो होतो.
लॉटरीनुसार, तो नुकताच लॉटरी मुख्यालयात त्याच्या बक्षीसावर दावा करण्यासाठी पोहोचला. लॉटरीत म्हटलं आहे की त्याने आयुष्यभर दरवर्षी 25,000 डॉ़लर ऐवजी 390,000 डॉ़लर (रु. 3.25 कोटी) एकरकमी पेमेंट निवडलं आहे. सोपेजस्टलने लॉटरीमध्ये सांगितले की, तो त्याच्या बक्षिसाची रक्कम प्रवासासाठी वापरेल आणि उर्वरित रक्कम सेव्ह करणार आहे. लकी फॉर लाइफ अनेक राज्यांमध्ये तसेच वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये खेळला जातो.