सर्वात अमानुष बलात्काऱ्याला जन्मठेपेची शिक्षा, तब्बल १९० पुरूषांवर केला होता त्याने बलात्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:46 AM2020-01-08T10:46:59+5:302020-01-08T10:48:22+5:30

३६ वर्षीय व्यक्तीच्या नावावर १५९ गुन्हे असून त्यातील १३६ हे बलात्काराचे आहेत. कोर्टानुसार, रेनहार्ड ४८ पुरूषांना फूस लावून फ्लॅटमध्ये घेऊन गेला होता.

Reynhard sinaga UK's most prolific rapist targeted men gets life in prison | सर्वात अमानुष बलात्काऱ्याला जन्मठेपेची शिक्षा, तब्बल १९० पुरूषांवर केला होता त्याने बलात्कार!

सर्वात अमानुष बलात्काऱ्याला जन्मठेपेची शिक्षा, तब्बल १९० पुरूषांवर केला होता त्याने बलात्कार!

Next

रेनहार्ड सनागा याला ब्रिटनमधील सर्वात अमानुष बलात्कारी म्हटलं जात आहे. एकूण १५९ लैंगिक अत्याचार करणाऱ्या या गुन्हेगाराची ओळख सार्वजनिक करण्यात आली आहे. या ३६ वर्षीय व्यक्तीच्या नावावर १५९ गुन्हे असून त्यातील १३६ हे बलात्काराचे आहेत. कोर्टानुसार, रेनहार्ड ४८ पुरूषांना फूस लावून फ्लॅटमध्ये घेऊन गेला होता आणि त्यांच्यासोबत बलात्कार केला. तर पोलिसांनी सांगितलं की, त्याने तब्बल १९० पुरूषांना आपलं शिकार केलं होतं.

ब्रिटनमध्ये राहणारा इंडोनेशियाचा नागरिक रेनहार्ड सनागाला कोर्टाने चार वेगवेगळ्या प्रकरणात १३६ बलात्कार, ८ बलात्कारांचा प्रयत्न आणि १४ इतर लैंगिक अत्याचारात दोषी ठरवलं आहे. पोलिसांनी सांगितले की, याचे पुरावे आहेत की, त्याने १९० पुरूषांवर बलात्कार केला होता. हा व्यक्ती आधीच दोन प्रकरणांमध्ये तुरूंगात शिक्षा भोगत आहे. आता कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेनहार्ड नाइट क्लब आणि बारमधून बाहेर येणाऱ्या पुरूषांची वाट पाहत होता. त्यानंतर त्यांना काहीतरी सांगून फ्लॅटवर घेऊन जायचा. बलात्कार करण्याआधी तो त्यांना बेशुद्ध होण्याचं औषध देत होता. त्यामुळे अनेकांना शुद्धीवर आल्यावर त्यांच्यासोबत काय झालं हे कळतंच नव्हतं. 

अनेक वर्षांपासून पुरूषांवर बलात्कार करणारा रेनहार्ड हा अटक होण्याआधी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये पीएचडी करत होता. त्याला २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. जेव्हा तो एका पुरूषावर बलात्कार करत होता तेव्हा तो पुरूष शुद्धीवर आला आणि त्याने पोलिसांना कळवले. रेनहार्डकडे शेकडो तासांचं व्हिडीओ फुटेजही मिळालं. 


Web Title: Reynhard sinaga UK's most prolific rapist targeted men gets life in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.