५०० गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळवून देतेय 'ही' महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 05:00 PM2020-01-12T17:00:17+5:302020-01-12T17:04:29+5:30

आत्तापर्यंत समाजात कार्यरत असलेले अनेक लोक आपल्याला माहित असतील ज्यांनी  समाजातील गरीब मुलांना मदतीचा हात दिला आहे.

Richa prasant changed lives of 500 street children | ५०० गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळवून देतेय 'ही' महिला

५०० गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळवून देतेय 'ही' महिला

Next

आत्तापर्यंत समाजात कार्यरत असलेले अनेक लोक आपल्याला माहित असतील ज्यांनी  समाजातील गरीब मुलांना मदतीचा हात दिला आहे. ज्यांच्या मदतीमुळे अनेक लोकांचे आयुष्य सफल झाले आहे. आज आम्ही तुम्हला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत.  ज्यांनी गोरगरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.

Image result for richa prasant
 ऋचा प्रशांत नावाची महिला  'द सुनय फ़ाउंडेशन' चालवत आहे. मागच्या १० वर्षात या महिलेने जवळपास ५०० गरीब मुलांना शाळेत दाखल केले आहे.  ऋचा या मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून  मोफत शिक्षण पूरवत आहेत.  इतकेच नाही तर मोफत शिक्षण , पुस्तकं आणि शाळेचा गणवेश सुद्धा देत आहेत.  शाळेतील मुलांना मध्यान्य भोजन ऋचा उपलब्ध करून देत आहेत.

Related image

ऋचा यांचे असे म्हणणे आहे की ,जगण्यासाठी गरजेच्या असलेल्या वस्तुंपासून वंचीत असलेल्या मुलांबद्दल त्यांचा मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. अशा गरजवंत मुलांना मदत करून त्यांना या मुलांचे आयुष्य बदलून टाकायचे आहे. म्हणून त्या  गरीब मुलांना शिक्षण मिळण्यासाठी झटत आहेत. जेणेकरून त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळं असल्यासारखं वाटणार नाही. ऋचा यांना मदत करण्यासाठी  अनेक स्वयंसेवक आहेत.  या गरीब मुलांना शिक्षण देण्यात सुमारे १०० लोकांची मदत आहे. यात ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंतच्या  स्वयंसेवकांचा समावेश आहे. या  सत्कार्यात ऋचा यांना त्यांच्या कुटूंबाचा तसेच मित्रपरिवाराचा आणि काही सामाजीक संघटनांचा सहभाग लाभला आहे. 

Image result for richa prasant

ऋचा यांनी या संस्थेची स्थापना २००९ मध्ये केली. त्यावेळी फक्त ६ मुलांना सोबत घेऊन त्यांनी सरूवात केली.  सध्याच्या परिस्थितीत त्याच्या देखरेखीखाली  शिक्षण घेत असलेल्यांची संख्या ५०० च्या पुढे आहे. ऋचा या फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक मुलांचे भवितव्य सुखकर करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

Image result for richa prasant

ऋचा या मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत. तर वेगवेगळे सेमिनार आणि वर्कशॉपचे आयोजन करून मुलांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात.  आपल्या या उपक्रमाबद्दल सांगताना ऋचा सांगतात की  नेहमीच फायदा होईल असं काम करण्यापेक्षा मी आत्मिक समाधान होईल असं आणि  लहान मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी काम करत आहे. 

Web Title: Richa prasant changed lives of 500 street children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.