सहारा वाळवंटातील निळ्या डोळ्याचं रहस्य, वैज्ञानिक अजूनही हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:21 PM2024-01-10T16:21:35+5:302024-01-10T16:21:59+5:30
Richat structure eye : याला 'आफ्रिकेचा डोळा' असंही म्हटलं जातं. हा 'डोळा' इतका विशाल आहे की, अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते.
Richat structure eye : पृथ्वी एक रहस्यमय ग्रह आहे. ज्यावर अनेक गोष्टींचे आजही गुपित उलगडण्यात आलेले नाहीत. आजही हजारो लोक यावर संशोधन करत आहेत. यातीलच एक रहस्य म्हणजे आफ्रिकेत आहे. आफ्रिकेच्या सहारा वाळवंटाच्या मधोमध तयार झालेला 50 किलोमीटर लांब आणि रूंद 'रिचट स्टॅक्चर'. याला 'आफ्रिकेचा डोळा' असंही म्हटलं जातं. हा 'डोळा' इतका विशाल आहे की, अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते.
जगभरातील वैज्ञानिक या डोळ्याचं रहस्य उलगडण्यात लागलेले आहेत. पण याच्या निर्मितीवरून फार वाद आहेत. काही हे एलियनने तयार केल्याचं म्हणतात. त्यांचं मत आहे की, हा विशाल डोळा एखाद्या परजीवीने तयार केला असावा.
मात्र, वैज्ञानिकांच्या सखोल अभ्यासानंतर असा अंदाज लावला गेला की, सहाराचा हा परिसर पूर्वी पूर्णपणे समुद्राने झाकलेला होता. हळूहळू बदल होत गेला आणि हा परिसर जगातल्या सर्वात मोठ्या वाळवंटात रूपांतरित झाला.
पाणी कमी होत असताना पाणी आणि वाळूने मिळून एका अशा आकृतीची निर्मिती केली, जी डोळ्यासारखी दिसते. पुढे जाऊन याला सहाराचा डोळा म्हटलं जाऊ लागलं. पण अजूनही हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही की, हा डोळा किंवा आकृती तयार कशी झाली.
खरंतर ही अशाप्रकारची एकुलती एक आकृती नाही. याप्रकारच्या अनेक आकृती पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळतात. ज्यात बेलिजच्या द ग्रेट ब्लू होलचाही समावेश आहे. आकाशातून पाहिल्यावर हा ३०० मीटर रूंद आणि १२० मीटर खोल खड्डा निळा दिसतो.