जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:23 PM2023-01-27T15:23:01+5:302023-01-27T15:27:11+5:30

Richest Man Ever : आम्ही तुम्हाला सांगत आहोत पश्चिम आफ्रिकेतील शासक मनसा मूसाबाबत. मनसा मूसाचा जन्म 1280 मध्ये आजचा आफ्रिकन देश  टिम्‍बकटू शहरात झाला होता.

Richest men ever in the world Manasa musa networth 400 billion dollar | जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक

googlenewsNext

Richest Man Ever : जगातील अब्जोपती लोकांचा लेखाजोखा ठेवणारी बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने डिसेंबर 2022 च्या सुरूवातील असं जाहीर केलं होतं की, टेस्‍लाचे सीईओ एलन मस्‍क यांना मागे सोडून लक्झरी ब्रॅन्ड लुई वुइटनची मूळ कंपनी एलवीएमएचचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट यांचा परिवार संपत्तीच्या बाबतीत सगळ्यात वर आहेत. त्यावेळी त्यांची संपत्ती 185.8 अरब डॉलर होती. जानेवारी 2023 मध्ये त्यांची संपत्ती वाढून 213 अब्ज डॉलर झाली आहे. पण इतिहासात एक अशीही व्यक्ती होऊन गेली त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावणंही अवघड होतं.

आम्ही तुम्हाला सांगत आहोत पश्चिम आफ्रिकेतील शासक मनसा मूसाबाबत. मनसा मूसाचा जन्म 1280 मध्ये आजचा आफ्रिकन देश  टिम्‍बकटू शहरात झाला होता. 1312 पर्यंत त्याला भाऊ मनसा अबु बक्र शासक होता. पण नंतर काही कारणामे मूसा राजा बनला. ज्यावेळी मनसा मूसा मालीचा शासक होता, तेव्हा तिथे सोन्याचे भांडार होते. असं म्हणतात की, त्यावेळी तिथे वर्षाला 1000 किलो सोनं तयार केलं जात होतं. अमेरिकन वेबसाइट सेलिब्रिटी नेटवर्थच्या एका अंदाजानुसार, मनसा मूसाची एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर पेक्षा जास्त होती. काही लोक म्हणतात त्याची संपत्ती यापेक्षा जास्त होती.

जगातल्या अर्ध्या सोन्याचा मालक

मनसा मूसाचं खरं मूळ नाव मूसा कीटा फर्स्‍ट होतं. शासक बनल्यानंतर त्याला मनसा म्हणत होते. ज्या अर्थ बादशाह असा होतो. असं म्हटलं जातं की, आजच्या मॉरीटानिया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना फासो, माली, नाइजर, चाड आणि नायजेरियावर मूसाचं राज्य होतं.

ब्रिटिश म्यूजियमच्या एका रिपोर्टनुसार, मनसा मूसाच्या ताब्यात जगातलं अर्ध्यापेक्षा जास्त सोनं होतं. तो फार धार्मिक होता. मूसाने त्याच्या 25 वर्षाच्या शासनकाळात अनेक मशिदी बांधल्या. ज्या आजही आहेत. ज्यातील एक म्हणजे टिम्बकटूमधील जिंगारेबेर मशिद आहे.

मालीचा शासक मनसा मूसा 1324 मध्ये मक्केच्या यात्रेसाठी मालीहून निघाला तेव्हा त्याच्यासोबत 60 हजार लोक होते. या लोकांसमोर 500 लोकांचा संघ होता. जे 500 सोन्याच्या छडी घेऊन चालत होते. मूसा या लोकांसोबत सहारा वाळवंटातून आणि इजिप्त मार्गे मक्का येथे पोहोचला होता.

यात 100 पेक्षा जास्त ऊंटांवर हजारो किलो सोनं लादलेलं होतं. प्रत्येक ऊंटावर 125 किलो सोनं लादलं होतं. यात्रे दरम्यान मूसाचा मुक्काम इजिप्तच्या काहिरा शहरात झाला. असं सांगितलं जातं की, मूसा इतका उदार होता की, तिथे त्याने सोनं दान करणं सुरू केलं. त्यामुळे तिथे सोन्याचा भाव अचानक पडला आणि महागाई वाढली.

मूसा काहिरातून गेल्यावर एक दशकापर्यंत सोन्याचे भावही वाढले नाही आणि महागाईही कमी झाली नाही. इतिहासकार सांगतात की, यामुळे काहिराची इकॉनॉमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. असं सांगितलं जातं की, मूसामुळे मध्य-पूर्व भागात हजारो कोटींचं नुकसान झालं. 

मूसाने माली ते मक्का ही 6500 किमीची यात्रा पूर्ण केली. मनसा मूसाचं 57 वयात 1337 मध्ये निधन झालं. त्यानंतर त्याचा मुलगा सत्ता टिकवू शकला नाही. यामुळे मूसाने तयार केलेलं हजारो मैलांचं साम्राज्‍य अनेक तुकड्यांमध्ये विभागलं. त्यावेळचा सगळ्यात महत्वाचा नकाशा कॅटलन एटलस होता. ज्यात मूसा आणि मालीच्या साम्राज्‍याचं नाव होतं.

Web Title: Richest men ever in the world Manasa musa networth 400 billion dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.