Richest Pets of the World: 4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर...हे आहेत जगातील सर्वात महाग प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 09:08 PM2023-01-08T21:08:36+5:302023-01-08T21:09:30+5:30

Richest Pets of the World: 800 कोटींची मांजर अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट हिची आहे.

Richest Pets of the World: A dog worth 4000 crores and a cat worth 800 crores... these are the most expensive animals in the world | Richest Pets of the World: 4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर...हे आहेत जगातील सर्वात महाग प्राणी

Richest Pets of the World: 4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर...हे आहेत जगातील सर्वात महाग प्राणी

googlenewsNext

पाळी प्राण्यांच्या किंमतीशी संबंधित सोशल मीडिया स्टडीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या स्टडीमध्ये कुत्रा-मांजराची किंमत करोडोंमध्ये सांगितली गेली आहे. यातील अनेक प्राण्यांना 'सेलिब्रेटी'चा दर्जा आहे. विशेष म्हणजे, या यादीतील एका कुत्रा हजारो कोटींचा आहे. 'ऑल अबाऊट कॅट्स'च्या अहवालात या प्राण्यांबद्दल सांगण्यात आले आहे.

अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टकडे(Taylor Swift) ऑलिव्हिया बेन्सन नावाची स्कॉटिश फोल्ड जातीची मांजर आहे. हा जगातील तिसरा सर्वात महागडा प्राणी असल्याचा दावा केला जात आहे. या मांजराची किंमत 800 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या क्रमांकावरही एक मांजर आहे. या मांजरीचाही सोशल मीडियावर मोठा प्रभाव आहे. तिचे नाव नाला कॅट असून, ती इन्स्टाग्रामवर @Nala_cat या नावाने लोकप्रिय आहे. या मांजरीचे इंस्टाग्रामवर 44 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्टमध्ये नालाची किंमत 825 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. नालाचे नाव 'गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंदवले गेले आहे.

महागड्या प्राण्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा गुंथर VI. त्याची मालकी इटालियन कंपनी गुंथर कॉर्पोरेशनकडे आहे. त्याची किंमत 4000 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या प्राण्यांची यादी इंस्टाग्राम अॅनालिटिक्सच्या आधारे तयार करण्यात आली आहे, दररोज एका सोशल मीडिया पोस्टवरून प्राणी किती कमावतात? यादी बनवताना या गोष्टी लक्षात ठेवण्यात आल्या आहेत.

जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या प्राण्यांबद्दल...
टेलर स्विफ्टच्या मांजरीनंतर जगातील सर्वात महागड्या प्राण्यांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रेचे कुत्रे शेडी, सनी, लॉरेन, लायला आणि ल्यूक यांचा समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे 250 कोटी आहे. पोमेरेनियन जातीचा जिफपोम नावाचा कुत्रा चौथ्या क्रमांकावर असून त्याची किंमत 200 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्डची मांजर पाचव्या क्रमांकावर आहे, तिची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री बेटी व्हाईटच्या कुत्र्याची किंमत 40 कोटींहून अधिक नोंदवण्यात आली आहे. 

Web Title: Richest Pets of the World: A dog worth 4000 crores and a cat worth 800 crores... these are the most expensive animals in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.