Robbery Video: एक कपडा, पाच चोरटे आणि अवघे पाच सेकंद; चोरट्यांचा कारनामा पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 06:56 PM2022-04-10T18:56:44+5:302022-04-10T18:58:18+5:30

Robbery Video: सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण, या व्हिडिओत चावीशिवाय दुकानाचे शटर उघडल्याचे दिसत आहे.

Robbery Video: Five Thieves, Five Seconds and a Cloth; see shocking robbery video | Robbery Video: एक कपडा, पाच चोरटे आणि अवघे पाच सेकंद; चोरट्यांचा कारनामा पाहून बसेल धक्का

Robbery Video: एक कपडा, पाच चोरटे आणि अवघे पाच सेकंद; चोरट्यांचा कारनामा पाहून बसेल धक्का

Next

Robbery Video: सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. बहुतेकवेळा व्हायरल झालेले चोरीचे व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असतात. आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सर्वात चकीत करणारी गोष्ट म्हणजे चोर चावीशिवाय शटर उघडताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

किल्लीशिवाय शटर उघडले
रात्रीच्या अंधारात पाच चोरटे एका दुकानाजवळ आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर त्यांनी चावीशिवाय मजबूत शटर तोडले. अवघ्या पाच सेकंदात चोरट्यांनी एका कपड्याच्या सहाय्याने शटर उघडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर चोरट्यांनी दुकानातील सर्व मौल्यवान ऐवज पळवून नेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

व्हिडिओत नेमकं काय?
काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात चोरटे रस्त्यावर येऊन उभे राहता. यानंतर ते आजूबाजूला कोणी आहे की नाही याचा आढावा घेतात आणि एका कपड्याने शटर उचकटून टाकतात. अवघ्या पाच सेकंदात शटरचा मधला भाग अगदी सहज बाहेर येतो. यानंतर शटर उघडताच चोरटे दुकानात जातात आणि मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करतात. इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

Web Title: Robbery Video: Five Thieves, Five Seconds and a Cloth; see shocking robbery video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.