डोअरस्टॉप म्हणून वापरलेला 'तो' दगड होता १ लाख डॉलरचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:29 PM2018-10-08T14:29:37+5:302018-10-08T14:30:11+5:30

हा दगड म्हणजे एक उल्का असून त्यामध्ये ८८.५ टक्के लोह आणि ११.५ टक्के निकेल होते असे त्यांना दिसले. तसेच त्याचे वजन २२ पौंड इतके असून  त्याची किंमत १ लाख डॉलर असल्याचे लक्षात आले

Rock used as Michigan man's doorstop is actually a meteorite worth $100K | डोअरस्टॉप म्हणून वापरलेला 'तो' दगड होता १ लाख डॉलरचा

डोअरस्टॉप म्हणून वापरलेला 'तो' दगड होता १ लाख डॉलरचा

googlenewsNext

मिशिगन- सलग तीस वर्षे दार आपटू नये म्हणून ठेवलेला दगड चक्क १ लाख डॉलर किमतीचा निघाला तर तुम्हाला कसे वाटेल? पण हे अगदी असंच झालंय. एका अमेरिकन नागरिकाच्या घरात डोअरस्टॉप म्हणून वापरलेला दगड साधासुधा नसून चक्क उल्का असल्याचे लक्षात आले आहे. सेंट्रल मिशिगन विद्यापिठातील मोना सिर्बेस्कू या भूगर्भशास्त्रज्ञाच्या प्राध्यापिकेने या दगडाचा अभ्यास केल्यावर त्यांना धक्काच बसला. 
    हा दगड म्हणजे एक उल्का असून त्यामध्ये ८८.५ टक्के लोह आणि ११.५ टक्के निकेल होते असे त्यांना दिसले. तसेच त्याचे वजन २२ पौंड इतके असून  त्याची किंमत १ लाख डॉलर असल्याचे लक्षात आले. शास्त्रीयदृष्ट्या आणि किंमतीच्या दृष्टीने इतका मौल्यवान नमूना मी आजवरच्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता, असे त्या म्हणाल्या या दगडाचे परिक्षण स्मिथसोनियन या वॉशिंग्टनमधील केंद्रामध्ये पुन्हा एकदा करण्यात आले. तेथेही याचप्रकारचे निरीक्षण नोंदवले गेले. 



या दगडाच्या मालकाच्या मतानुसार १९३० साली हा दगड पृथ्वीवर आला. १९८८ साली त्याने एडमोर येथे एक शेत विकत घेतले. तेथे हा दगड होता. इतरांपेक्षा वेगळा दिसणारा हा दगड त्याने डोअरस्टॉप म्हणून वापरायला घेतला. काही वर्षे फार्महाऊसमध्ये राहिल्यावर त्याने घर बदलले मात्र हा दगड नेहमीच आपल्याबरोबर ठेवला. मिशिगनमधल्या लोकांनी आपल्याकडचे उल्काखडक विकण्यासाठी काढल्यावर या माणसालाही आपल्याकडचा दगड लोकांना दाखवावा त्याचे परीक्षण करुन घ्यावे असे वाटले. सेंट्रल मिशिगन विद्यापीठाच्या माहितीनुसार स्मिथसोनियन आणि मिनरल म्युझियम हा दगड विकत घेण्याच्या बेतात असून त्यानंतर तो सर्वांना पाहाण्यासाठी ठेवण्यात येइल.

Web Title: Rock used as Michigan man's doorstop is actually a meteorite worth $100K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.