सुपर मार्केटमध्ये आढळून आलं गोलाकार अंड, किंमत इतकी की आकडा वाचून अवाक् झाले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:38 AM2023-06-20T09:38:21+5:302023-06-20T09:39:48+5:30
One In A Billion Egg : ऑस्ट्रेलियाच्या एका सुपर मार्केटमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक गोलाकार अंड सापडलं आहे. जे बघून लोक अवाक् झाले आहेत.
One In A Billion Egg : सामान्यपणे तुम्ही कुठेही पाहिलं तरी कोंबडीच्या अंड्यांचा आकार हा गोलाकार नसून थोडा लांबट असतो. इतरही बऱ्याच पक्ष्यांची अंडी ही गोलाकार नसतात. पण जर गोलाकार अंड सापडलं तर तो चमत्कारच मानला जातो. ऑस्ट्रेलियाच्या एका सुपर मार्केटमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक गोलाकार अंड सापडलं आहे. जे बघून लोक अवाक् झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील आहे. येथील सुपर मार्केटमध्ये हे गोलाकर अंड आढळून आलं. याची खासियत म्हणजे हे अंड पूर्ण गोलाकार आहे. अशा अंड्याला 'वन इन ए बिलियन' अंड म्हटलं जातं. आता या अंड्याच्या किंमतीचा अंदाज लावला तर लोक आकडा वाचून हैराण झालेत.
एका दुसऱ्या मीडिया रिपोर्टनुसार, या अंड्याबाबत जर्नलिस्ट जॅकलीन फेलगेटने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली आहे. त्यांनी याचा एक फोटो शेअर केला आहे. याबाबत त्यांनी अधिक माहिती मिळवली तेव्हा समजलं की, कोट्यावधीमध्ये एकच अंड गोलाकार असू शकतं. एकदा एका गोलाकार अंड्याची किंमत 78 हजार रूपये लावण्यात आली होती. त्यानुसार या अंड्याची किंमतीही याच्या आसपास मिळू शकते.
जॅकलीन फेलगेट गमतीने म्हणाल्या की, तुमच्याकडे जर असं गोलाकार अंड असेल तर सांभाळून ठेवा. त्या म्हणाल्या की, अंड्याच्या कार्टनमध्ये आम्हाला एक गोल अंड मिळालं आणि जेव्हा मी याच्या अनोख्या आकाराबाबत गुगल केलं तेव्हा समजलं की, याला 'वन इन ए बिलियन अंड' म्हटलं जातं. मला वाटलं की, या अंड्याबाबत लोकांना अधिक समजलं पाहिजे. पण त्यांनी हे नाही सांगितलं की, हे अंड कुणाचं आहे.