रेल्वेच्या छतावर का असतात ही झाकणं? तुम्हालाही माहीत नसेल यांचा उद्देश...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 05:16 PM2024-09-26T17:16:16+5:302024-09-26T17:19:28+5:30

रेल्वेच्या छतावर तुम्ही गोल झाकणं तर पाहिली असतीलच. पण तुम्हाला यांचा उद्देश, काम माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Round shape lids on train roof round all you need to know | रेल्वेच्या छतावर का असतात ही झाकणं? तुम्हालाही माहीत नसेल यांचा उद्देश...

रेल्वेच्या छतावर का असतात ही झाकणं? तुम्हालाही माहीत नसेल यांचा उद्देश...

Indian Railway Finest Technique: भारतात लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. पण जास्तीत जास्त लोकांना रेल्वेसंबंधी अनेक गोष्टी माहीत नसतात. रेल्वेच्या छतावर तुम्ही गोल झाकणं तर पाहिली असतीलच. पण तुम्हाला यांचा उद्देश, काम माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारतीय रेल्वेमध्ये जबरदस्त टेक्नीकचा वापर केला जातो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, रेल्वेच्या छतात झाकणासारखं काहीतरी असतं. यांचं काय काम असतं हे अनेकांना माहीत नसतं. चला तर मग जाणून घेऊ.

रेल्वेच्या छतांवर लावण्यात आलेल्या या गोल प्लेट किंवा झाकणं एकप्रकारे व्हेंटिलेशन सिस्टीमचा भाग आहेत. जेव्हा रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी असते तेव्हा तापमान वाढतं आणि हवेतही उष्णता वाढते. अशात ही झाकणं अतिरिक्त उष्णता आणि ओलावा बाहेर काढण्याचं काम करतात. ज्यामुळे रेल्वेच्या डब्यांमध्ये ताज्या हवेचा प्रवाह कायम राहतो आणि प्रवाशांना श्वास घेण्यास मदत मिळते.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर रेल्वेच्या छतांवर ही खास झाकणं राहिली नाही तर प्रवाशांना गरमी आणि भरलेल्या रेल्वेने प्रवास करणं अवघड होईल. या झाकणासोबतच डब्यांच्या आत एक जाळीदार छतही असतं. हेही व्हेंटिलेशनचं काम करतं.

काही रेल्वेंमध्ये जाळीदार छत असते, तर काहींमध्ये छिद्र असलेल्या प्लेट्स असतात. हे दोन्ही डिझाइन कोचमधून गरम हवा बाहेर काढण्यास मदत करतात. या प्लेट्सचं आणि जाळ्यांचं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे यांमुळे पावसाचं पाणी आत जात नाही. 

Web Title: Round shape lids on train roof round all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.