गजराजासाठी शाही स्नान
By admin | Published: January 10, 2017 01:06 AM2017-01-10T01:06:53+5:302017-01-10T01:06:53+5:30
भारतात हत्तींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक धार्मिक उत्सवात हत्तींना मानाचे स्थान असते. केरळातील गुरुवायूरच्या मंदिरातील
गुरुवायूर : भारतात हत्तींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक धार्मिक उत्सवात हत्तींना मानाचे स्थान असते. केरळातील गुरुवायूरच्या मंदिरातील मिरवणुकीत हत्तींची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारतात उन्हाळ्याच्या दिवसांत तर अनेक ठिकाणी हत्तींना शाही स्नान घातले जाते. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी हत्तींच्या अंगावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जातात. हत्तींना मालीश केले जाते. त्यांच्या आहाराकडेही विशेष लक्ष पुरविले जाते. गुरुवायूरमध्येही हत्तींची खास बडदास्त ठेवली जाते. हत्तींवर देखरेखीसाठी विशेष व्यक्तींची नेमणूकच केलेली असते. याशिवाय केरळमध्ये अनेक ठिकाणी हत्तींना स्थान घालण्याची सोय करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर हत्तींना स्थान घालणारे अनेक लोक आहेत. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसायच तो आहे. हत्तींसाठी विशेष स्पा आहेत, केरळमध्ये असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हत्तींबाबत औत्सुक्य आहे. अगदी स्थानिक सण, उत्सवात, पालखी सोहळ्यात हत्तींना मानाचे स्थान आजही कायम आहे.