जगातली सगळ्यात मोठी क्रूज शिप, जहाजावरच आहे वॉटर पार्क आणि 9 स्वीमिंग पूल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 05:01 PM2023-06-30T17:01:57+5:302023-06-30T17:13:17+5:30
Royal Caribbean’s Icon of the Seas : नुकतेच जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूजचे फोटो समोर आलेत. हे जहाज इतकं मोठं आहे की, जणू जहाजावरच एखादं मोठं शहर वसवलं. हे जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरवलं जाणार आहे.
Royal Caribbean’s Icon of the Seas : जसजशी टेक्नॉलॉजी अधिक विकसित होत जाते नवनवीन लक्झरी वस्तू बाजारात येतात. लोकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आणि त्यांचं जगणं सोपं करण्यासाठी या गोष्टी तयार केल्या जातात. काही वस्तू तर अशा असतात ज्या बघून विश्वासच बसत नाही. काही वर्षाआधी समुद्रात छोट्या छोट्या क्रूजवर प्रवास करून लोक आनंदी व्हायचे. पण आता लक्झरी या शब्दाचा अर्थच फार व्यापक झाला आहे.
नुकतेच जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूजचे फोटो समोर आलेत. हे जहाज इतकं मोठं आहे की, जणू जहाजावरच एखादं मोठं शहर वसवलं. हे जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरवलं जाणार आहे. याचं नाव आहे Royal Caribbean’s Icon of the Seas. याची खासियत म्हणजे यावर तुम्हाला वॉटर पार्क सोबतच 9 स्वीमिंग पूलही दिसतील.
या जहाजावर त्या सगळ्या सुविधा मिळतील ज्या एखाद्या शहरात राहण्यासाठी गरजेच्या असतात. हे विशाल जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरणार असलं तरी बनून पूर्ण तयार आहे. या जहाजाचं सौंदर्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे जहाज अनेक दृष्टीने रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावर वॉटर पार्कही आहे.
इतकंच नाही तर या जहाजाच्या आत साधारण 40 रेस्टॉरन्टही आहेत. हे जहाज फिनलॅंडमध्ये तयार केलं जात आहे. सध्या जहाज तयार होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. हे जहाज आतापर्यंतचं सगळ्यात मोठं जहाज आहे. याचं वजन शंभर लाख टनांपेक्षा जास्त आहे.
ज्या कंपनीने हे जहाज तयार केलं त्या कंपनीने याआधी याची सिस्टर शिप पाण्यात उतरवली आहे. सांगण्यात येत आहे की, पुढील वर्षाच्या सुरूवातीला हे जहाज पाण्यात उतरवलं जाईल. यावर एकाचवेळी 5 हजार 610 प्रवासी बसवले जातील.