अबब! आसामच्या चहासाठी मोजले ९९,९९९ रुपये! 'गोल्डन पर्ल टी'साठी विक्रमी बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:59 AM2022-02-17T06:59:01+5:302022-02-17T06:59:34+5:30

उच्च दर्जाची चहाची पाने योग्य खरेदीदारापर्यंत पोहोचावित यासाठी चहाच्या पानांची बोली लावली जाते.

Rs 99,999 counted for Assam tea! Record bid for 'Golden Pearl Tea' | अबब! आसामच्या चहासाठी मोजले ९९,९९९ रुपये! 'गोल्डन पर्ल टी'साठी विक्रमी बोली

अबब! आसामच्या चहासाठी मोजले ९९,९९९ रुपये! 'गोल्डन पर्ल टी'साठी विक्रमी बोली

Next

नवी दिल्ली : आसाममधील गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्रात सोमवारी गोल्डन पर्ल चहाच्या पानांसाठी विक्रमी बोली लावण्यात आली. आसामच्या डिब्रुगढमधील या खास चहाच्या पानाच्या एक किलोच्या पॅकसाठी आसाम चहाच्या व्यापाऱ्यांनी ९९,९९९ रुपयांची बोली लावली. अवघ्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा एका कंपनीची एक किलो चहाची पाने ९९,९९९ रुपयांना विकत घेण्यात आली आहेत. 
डिसेंबर २०२१ मध्ये गोल्डन बटरफ्लाय चहा पाने याच दराने खरेदी करण्यात आली होती. या लिलावात अनेक मोठ्या चहा कंपन्यांनी भाग घेतला होता, परंतू गोल्डन पर्ल टी हा सर्वोत्तम मानला गेला.

उच्च दर्जाचा चहा
उच्च दर्जाची चहाची पाने योग्य खरेदीदारापर्यंत पोहोचावित यासाठी चहाच्या पानांची बोली लावली जाते. यासाठी जगभरात चहा लिलाव केंद्रे उघडण्यात आली आहेत, जिथे कंपन्या स्वतःच्या चहाच्या पानांचे नमुने पाठवतात. सर्व कंपन्यांचे नमुने समान तापमान, प्रमाणाच्या आधारे तपासले जातात आणि त्यानंतर सर्वोत्तम चहा घोषित केला जातो. त्यानंतर मूळ किंमतीवर बोली लावली जाते.

Web Title: Rs 99,999 counted for Assam tea! Record bid for 'Golden Pearl Tea'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.