सतत चिडचिड होते, राग येतो? फॉलो करा रूल-12, कधीच होणार नाही तुम्ही हायपर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 11:47 AM2023-09-29T11:47:31+5:302023-09-29T11:48:42+5:30
एका प्रसिद्ध सायकॉलॉजिस्टने रूल-12 फॉर्मूला शेअर केला आहे. जो फार लोकप्रिय ठरत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव येणं सहाजिक आहे. पण अनेकदा यामुळे आपल्याला राग येतो. काहीही झालं तरी आपण संतापतो. ओरडू लागतो. जर तुम्हालाही सतत राग येत असेल एक फॉर्मूला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. एका प्रसिद्ध सायकॉलॉजिस्टने रूल-12 फॉर्मूला शेअर केला आहे. जो फार लोकप्रिय ठरत आहे. त्यांचा दावा आहे की, जर हा फॉर्मूला फॉलो केला तर राग येणं तर दूरच तुम्ही कधीच चिडणार नाही.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे डॉ. डॅनिअल आमीन यांनी हा फॉर्मूला तयार केला आहे. ते स्वत:ही याचं पालन करतात. ते म्हणाले की, तुम्ही हे ठरवा की, दिवसातून 12 गोष्टी चुकीच्या होईपर्यंत तुम्ही शांत रहाल आणि त्यानंतर संताप कराल. हे एक मनोविज्ञान आहे. कारण हे तुम्ही तुमच्यासाठी ठरवलं आहे. जसे की, तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नसेल, रस्त्याने काही समस्या झाली असेल, कुणासोबत वाद झाला असेल तर तुम्ही शांत रहाल. ते म्हणतात की, 13व्या चुकीची वेळच येणार नाही. कारण हळूहळू तुमचं मन यासाठी तयार होईल आणि मग एक दिवस असा येईल की, तुम्ही सतत चिडचिड, राग करणं विसरून जाल.
आजारांना कराल कंट्रोल
डॉ. आमीन म्हणाले की, मी माझ्या सगळ्या रूग्णांना हा नियम फॉलो करण्यास सांगतो. याने हायपरटेंशन, डायबिटीससारख्या आजारांवरही कंट्रोल मिळवता येतो. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की, तुम्हाला तुमच्यासाठी एक डेडलाइन बनवायची आहे. याचा माझ्या डोक्यात विचार तेव्हा आला जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत सुट्टीवर गेलो होतो. मला माहीत आहे की, 12 गोष्टी चुकीच्या होणार आहेत आणि जेव्हा 13व्या गोष्ट चुकीची होणारच नाही तर मी चिडचिड करणारच नाही, ओरडणार नाही आणि रागावणार नाही.
डॉ. आमीन म्हणाले की, मी अनेक वर्षापासून हे फॉलो करत आहे आणि विश्वास ठेवा की, आजपर्यंत कधीही 6 गोष्टींपेक्षा जास्त चुका झाल्या नाहीत. म्हणजे 13 नंबर आलाच नाही. ते म्हणाले की, ते समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्या फोनमध्ये नोट करून ठेवतात. जेवढी तुम्ही मान्य कराल तेवढी कठिण गोष्टींचा सामना करण्याची क्षमता वाढेल. टिकटॉकवर शेअर करण्यात आलेला त्यांचा व्हिडीओ फारच गाजत आहे. आतापर्यंत 23 लाख वेळा तो बघण्यात आला.