दावा : पाकिस्तानी डॉक्टरच्या प्रेमात होती प्रिंसेस डायना, लग्न करून तिथेच राहण्याची होती इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:40 AM2020-08-13T11:40:25+5:302020-08-13T11:59:52+5:30

मेल ऑनलाइननुसार, 'डायना : हर लास्ट समर' मध्ये पोलार्डने दावा केला आहे की, प्रिंसेस ऑफ वेल्स डायना ही जेमीमा गोल्डस्मिथसोबत पाकिस्तानात राहण्याबाबत बोलत होती.

Rumored love story of Princess Diana and Pakistani surgeon Hasnat Khan | दावा : पाकिस्तानी डॉक्टरच्या प्रेमात होती प्रिंसेस डायना, लग्न करून तिथेच राहण्याची होती इच्छा!

दावा : पाकिस्तानी डॉक्टरच्या प्रेमात होती प्रिंसेस डायना, लग्न करून तिथेच राहण्याची होती इच्छा!

googlenewsNext

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्सची दिवंगत पत्नी प्रिंसेस डायनाला पाकिस्तानातील आपल्या प्रियकरासोबत येऊन राहण्याची इच्छा होती. अशाप्रकारच्या अफवा गेल्या अनेक वर्षात पसरल्या आहेत. अफवा अशी आहे की, डायनाला पाकिस्तानातील एका व्यक्तीवर प्रेम झालं होतं. पण याचा पुरावा कुणीच देऊ शकलं नाही. आता ब्रिटीश एक्सपर्ट ईव पोलार्डने दिलेल्या माहितीवर आधारित डॉक्युमेंटरीमध्ये याबाबतचे दावे करण्यात आले आहेत.

'लग्न करून पाकिस्तानात रहायचं होतं'

मेल ऑनलाइननुसार, 'डायना : हर लास्ट समर' मध्ये पोलार्डने दावा केला आहे की, प्रिंसेस ऑफ वेल्स डायना ही जेमीमा गोल्डस्मिथसोबत पाकिस्तानात राहण्याबाबत बोलत होती. जेमीमा गोल्डस्मिथ ही सद्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पत्नी होती. आणि ती लाहोरमध्ये राहत होती. पोलार्डने सांगितले की, कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं की, डायना पाकिस्तानातील एका डॉक्टरसोबत लग्न करून तिथे राहण्याचा विचार करतेय.

'...म्हणून तुटलं नातं'

1997 मध्ये डायना पाकिस्तानात गेली होती आणि यावेळी गुपचूपपणे डॉक्टर हजनत खानच्या आई-वडिलांना भेटली होती. पण मीडिया अटेंशनमुळे दोघांचं नातं बिघडलं. हजनतला हे नातं खाजगी ठेवायचं होत. असेही सांगितले की, दोघांना ओळखणारे मित्र त्यांना गुपचूपपणे भेटण्यासाठी मदतही करत होते. माजी पत्रकार जेनी बॉन्डनुसार, याबाबत नेहमीच चर्चा होत होती की, डायना एका हार्ट सर्जनवर प्रेम करते. पण कुणालाच खरं माहीत नव्हतं. आणखी एक पत्रकार रिचर्ड केकेनुसार, डायना हजनतकडे फार आकर्षित होती.

'सतत हजनतबाबत विचारणा'

रिचर्डने सांगितले की, दोघेही मीडिया प्रेशरमुळे वेगळे झाले आणि त्यावेळी डायना म्हणाली होती की, तुला दुसरं कुणी मिळणार नाही. ब्रेकअपनंतर ती हॅरड्सचे मालक अल-फायद आणि त्यांच्या मुलासोबत वेळ घालवू लागली होती. डायनाचे बटलर राहिलेल्या पॉल बरलनुसार, यादरम्यान डायना प्रयत्न करत राहिली की, मीडियाने तिचे फोटो घ्यावेत. जेणेकरून हजनतने ते बघावे. नंतर ती पॉलला विचारत होती की, हजनतला पाहिले का. तेच हजनत डायनाचं नवीन आयुष्य पाहून नाराज होता'.
 

Web Title: Rumored love story of Princess Diana and Pakistani surgeon Hasnat Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.