सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:47 AM2020-08-11T09:47:20+5:302020-08-11T09:58:24+5:30
कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये शुक्रवारी एका मोठा साप दिसला होता. इतका मोठा साप बघून त्याला धक्का बसला.
सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या रसेल्स वायपर सापाने कोयम्बटूरमधील प्राणी संग्रहालयात ३३ पिल्लांना जन्म दिलाय. रसेल्स वायपर हा साप इतर सापांपेक्षा वेगळा असतो. याची खासियत ही असते की, ते एकदा ४० ते ६० पिल्लांना जन्म देऊ शकतात. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथनने न्यूज एजन्सी एएनआयला सांगितले की, 'आमच्या प्राणी संग्रहालयात नुकताच एका रसेल्स वायपर सापाने ३३ पिल्लांना जन्म दिला'.
सेंथिल नाथन म्हणाला की, काही वर्षांआधी आणखी एका सापाने साठ पिल्लांना जन्म दिला होता. याआधी जूनमध्ये रसेल्स वायपर एका सर्पमित्राने कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरातील एका घरातून रेस्क्यू केला होता. रसेल्स वायपर भारतात आढळणारे सर्वात विषारी सापांच्या प्रजातीपैकी एक आहे.
प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथन म्हणाले की, या सापांना सांभाळणं फार कठिण आहे. त्यामुळे हे सगळे साप वन अधिकाऱ्यांना सोपवले जातील. शिकाऱ्यांमुळे हे सगळेच साप जिवंत राहू शकणार नाहीत. काही वर्षांआधी एका सापाने तब्बल ६० पिल्लांना जन्म दिला होता.
कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये शुक्रवारी एका मोठा साप दिसला होता. इतका मोठा साप बघून त्याला धक्का बसला. त्याने नंतर काही सर्पमित्रांची मदत मागितली होती. त्यांनी हा साप रसेल्स वायपर असल्याचे ओळखले. हा साप सर्वात विषारी सापांपैकी एक आहे.
वन विभागाच्या टीमने सांगितले की, रसेल्स वायपर सापाच्या पिल्लांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथन म्हणाले की, सर्व पिल्ले चांगले आहेत. रसेल्स वायपर सापाने एका वेळी इतक्या पिल्लांनी जन्म देणं शुभ संकेत मानला जातो.
हे पण वाचा :
तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल
कारच्या टायरमध्ये लपला होता अजगर, पाहून महिलेची चांगलीच उडाली भांबेरी
देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, फायदे अन् किंमत वाचाल तर चक्रावून जाल!