बाबो! होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी याने असं काही केलं की नाकातोंडातून येईल धूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 12:43 PM2019-12-16T12:43:42+5:302019-12-16T12:53:40+5:30

सर्वसाधारणपणे होणाऱ्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी पुरूष वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

Russia human mountain pulled 218 tonne train at vladivostok railway station | बाबो! होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी याने असं काही केलं की नाकातोंडातून येईल धूर...

बाबो! होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी याने असं काही केलं की नाकातोंडातून येईल धूर...

Next

(Image credit-daily express)

सर्वसाधारणपणे होणाऱ्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी पुरूष वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण तुम्ही पत्नीला इम्पैस करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं ऐकलयं का? रूस येथिल रहीवासी असलेल्या एका पठ्ठ्याने बायकोला इम्प्रेस करण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे. जाणून घ्या या व्यक्तीने काय केलय.

एखाद्या पैलवानाला २०० ते ३०० किलो वजन उचलण्यासाठी नाकात दम येतो. पण रशियातील रुस या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने २१७ टन म्हणजेच १ लाख ९७ हजार किलो वजनाची ट्रेन खेचून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. या व्यक्तीचं नाव इवान सौकिन आहे. त्यांनी हा उपक्रम व्लादिवोस्तोक या शहारात केला आहे. इवान हा संपूर्ण रूस शहरात ह्यूमन माऊंटन या नावाने प्रसिध्द आहे. माध्यमांनी दिेलेल्या वृत्तांनुसार या व्यक्तीने हे भारी वजन उचलण्यासाठी  गेल्या एका वर्षापासून अथ्थक परीश्रम घेतले.

या व्यक्तीने होणाऱ्या पत्नीला प्रभावित करण्यासाठी ही  कामगिरी केल्याचे त्याने सांगितले. यापुढे १२ हजार चारशे टन वजनाच्या जहाजाला खेचण्याचा त्याचा प्रयत्न आहे. एवढे जास्त वजन खेचण्याचा प्रयत्न हा त्या व्यक्तीचा प्रयत्न पहिला नसून भारतात आत्तापर्यंत अनेक व्यक्तींनी वर्ल्ड रेकॉड केले आहेत. भारतातील वेलू रथकृष्णन या व्यक्तीने १८ऑक्टोबर २००३ साली मेलिशियातील क्वालालंपूर या रेल्वे स्थानकात स्वतःच्या दातांनी २६०.८ टन वजनाचे २ केटिएम ट्रेन्सला ४.२ मीटर खेचून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. 

तसंच मध्यप्रदेशच्या विदिशा या ठिकाणचा रहीवासी असलेल्या ब्रम्हचारी  आशिष याने ६५ टन वजनाच्या रेल्वे इंजिनाला आपल्या दातांनी खेचलं होतं. तर ग्वाल्हेरला राहणाऱ्या आरती आणि सविता यांनी नॅरोगेज ट्रेनच इंजिन खेचलं होतं. हा पराक्रम केल्यामुळे सविता आणि आरती या दोघांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉडमध्ये दाखल करण्यात आले होते. 

Web Title: Russia human mountain pulled 218 tonne train at vladivostok railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.