झटपट बॉडी बनवण्याचा नाद जीवावर बेतला; युवकाला भलताच कारनामा नडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:05 PM2021-09-20T13:05:44+5:302021-09-20T13:08:56+5:30

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, झटपट बॉडी बनवण्याच्या क्रेझने किरील टेरेशिनने स्वत:च्या हाताने पेट्रोल जेलीचे इंजेक्शन लावणं सुरु केले.

Russian bodybuilder is warned he faces 'death' unless he removes lumps of hardened petroleum jelly | झटपट बॉडी बनवण्याचा नाद जीवावर बेतला; युवकाला भलताच कारनामा नडला

झटपट बॉडी बनवण्याचा नाद जीवावर बेतला; युवकाला भलताच कारनामा नडला

googlenewsNext
ठळक मुद्देया इंजेक्शनचा परिणाम पहिल्यांचा किरीलच्या बाइसेप्सवर दिसू लागलाप्रकृती नाजूक झाल्याने त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं.शरीरातील रक्त प्रवाहावर त्याचा परिणाम झाला. त्याला अतिताप आणि वेदना होऊ लागल्या.

एक रशियन बॉडी बिल्डर आणि माजी सैनिकाला हल्कसारखी बॉडी बनवण्याच्या नादात त्याला अडचणीत टाकलं आहे. या व्यक्तीचा जीव धोक्यात आला आहे. २५ वर्षीय किरील टेरेशिनने एक्सरसाइज करून बॉडी बनवण्याऐवजी पेट्रोल जेली(Petroleum Jelly) सारखं इंजेक्शन घेऊन बॉडी बनवण्याचा शॉर्टकट वापरला तो किरीलच्या जीवावर बेतला आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, झटपट बॉडी बनवण्याच्या क्रेझने किरील टेरेशिनने स्वत:च्या हाताने पेट्रोल जेलीचे इंजेक्शन लावणं सुरु केले. या इंजेक्शनचा परिणाम पहिल्यांचा किरीलच्या बाइसेप्सवर दिसू लागला. हळूहळू त्याने तब्बल ६ लीटर पेट्रोलियम जेली इंजेक्शन शरीराला लावले होते. त्यामुळे किरीलचे बाइसेप्स २४ इंचाचे झाले. परंतु काही दिवसांतच त्याच्या हाताची अवस्था खूप खराब झाली. त्याची प्रकृती नाजूक झाल्याने त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं.

हॉस्पिटलमध्ये किरीलवर सर्जरी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या हातातून सिंथोल ऑयल आणि डेड मसल्ज टिशूज काढण्यात आले. आणखी एक सर्जरी करत त्याला खोटे बाइसेप्स बाहेरून लावण्याची तयारी केली. परंतु अद्यापही किरील टेरेशिनला दिलासा मिळाला नाही. बाइसेप्स सर्जरीनंतर त्याला अनेक सर्जरीचा सामना करावा लागला. बॉडी बनवण्याच्या नादात इंजेक्शन घेतलं परंतु त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाहावर त्याचा परिणाम झाला. त्याला अतिताप आणि वेदना होऊ लागल्या.

याबाबत सर्जन दिमित्री मेलनिकोव यांनी इशारा दिलाय की, अशा प्रकारामुळे शरीरातील गुंतागुंत अधिक धोकादायक बनू शकते. परंतु रुग्णाची मदत करता येत नाही. शरीरात एक विषारी पदार्थ खूप काळ आतमध्ये राहिल्यास तो धोक्याचा असतो आणि मृत्यूचं कारणही बनू शकतो. इतकचं नाही तर किरीलचा जीव वाचवण्यासाठी त्याचे हातही कापायला लागू शकतात. तर आता किरील म्हणतो की, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. बॉडी बनवण्याच्या क्रेझमुळे मला शॉटकट वापरायला नको होता. इंजेक्शनमुळे माझ्या शरीराची अशी अवस्था झाली त्याची खंत त्याला वाटते.    

असं का घडतं?

अतिव्यायाम, अतिमहत्त्वाकांक्षा किंवा चुकीच्या पद्धतीनं केलेला व्यायाम बर्‍याचदा आपल्या अंगाशी बेतू शकतो. व्यायाम करताना आपण कशासाठी व्यायाम करतोय हे अगोदर आपण समजून घेतलं तर असे प्रकार टाळता येऊ शकतील. कुठल्यातरी हीरोची बॉडी तगडी आहे, सिक्स पॅक्स आहेत, पडद्यावर तो एकदम मॅनली दिसतो, अमुक एका हिरोइनची फिगर झिरो साइज आहे, गेल्या कित्येक वर्षात तिच्या अंगावरची चरबी एक सेंटीमीटरनंही वाढलेली दिसली नाही, म्हणून आपणही तसंच दिसलं पाहिजे आणि त्यासाठी वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे, हा हव्यास बर्‍याचदा तरुणांना नको त्या दिशेला घेऊन जातो.

Web Title: Russian bodybuilder is warned he faces 'death' unless he removes lumps of hardened petroleum jelly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.