भारतात स्वत:साठी नवरदेव शोधत होती रशियन तरूणी, एअरपोर्टवर तिच्यासोबत झालं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 17:31 IST2024-04-26T17:30:36+5:302024-04-26T17:31:24+5:30
आज लोक फेमस होण्यासाठी काहीही करतात. एका रशियन मुलीला भारत इतका आवडला की, ती तिच्यासाठी भारतात नवरदेव शोधण्यासाठी आली.

भारतात स्वत:साठी नवरदेव शोधत होती रशियन तरूणी, एअरपोर्टवर तिच्यासोबत झालं असं काही....
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. अनेकदा तर अशा गोष्टी बघायला मिळतात ज्यांवर विश्वासही बसत नाही किंवा कधी कल्पनाही केलेली नसते. लोक आपल्या लग्नासाठीही सोशल मीडियावर जाहिरात देतात. पण अनेकदा यामुळे वेगळ्या घटनाही घडतात. अशाच एका वेगळ्या घटनेबाबत आम्ही सांगणार आहोत.
आज लोक फेमस होण्यासाठी काहीही करतात. एका रशियन मुलीला भारत इतका आवडला की, ती तिच्यासाठी भारतात नवरदेव शोधण्यासाठी आली. पण तिची नवरदेव शोधण्याची पद्धत फारच कॅज्युअल आणि अजब होती. त्यामुळे तिला एअरपोर्टवर असं सरप्राइज मिळालं, ज्याचा तिने विचारही केला नसेल.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक परदेशी तरूणी तिच्यासोबत झालेल्या घटनेबाबत सांगत आहे. तरूणीने सांगितलं की, ती एअरपोर्टवर गेली होती. इथे एका पासपोर्ट अधिकाऱ्याने तिला त्याचा नंबर लिहून दिला आणि कॉल करण्यास सांगितलं. रशियन तरूणी अधिकाऱ्याच्या या व्यवहाराने हैराण झाली. ती म्हणाली की, हे असं कसं वागणं आहे. ही तरूणी आधीही सोशल मीडियावर फेमस झाली आहे. कारण ती म्हणाली होती की, ती तिच्यासाठी एक भारतीय नवरदेव हवा आहे.
यासाठी ती तिच्या प्रोफाइलचा क्यूआर कोड वेगवेगळ्या ठिकाणी लावत होती.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरर dijidol नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हे दिनारा नावाच्या मुलीचं अधिकृत अकाऊंट आहे. व्हिडीओला 24 तासांच्या आत 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 15 हजार लोकांनी लाइक केलं आहे.