पाळीव मांजरीने पंजा मारल्यावर मालकाचा गेला जीव, जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:56 PM2024-11-29T16:56:31+5:302024-11-29T16:57:25+5:30
तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही, पण एका व्यक्तीचा त्याच्या पाळीव मांजरीमुळे जीव गेला आहे.
आजकाल भरपूर लोकांच्या घरात पाळीव प्राणी बघायला मिळतात. कुणाकडे श्वास तर कुणाकडे मांजरी असतात. काही लोकांनी मांजरीची इतकी आवड असते की, त्यांच्या घरात एकापेक्षा जास्त मांजरी असतात. लोक या जीवांची घरातील सदस्यांसारखी काळजीही घेतात. मात्र, कधी कधी या प्राण्यांमुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामनाही मालकांना करावा लागतो. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही, पण एका व्यक्तीचा त्याच्या पाळीव मांजरीमुळे जीव गेला आहे.
घरात पाळीव प्राण्यांना जीव लावणं काही वाईट गोष्ट नाही. पण त्यांचा सांभाळ करताना स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे. कारण प्राण्यांना हे माहीत नसतं की, मालकाला काय आहे किंवा काय समस्या आहे.
रशियातील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. या व्यक्तीची पाळीव मांजर जंगलात निघून गेली होती. ५७ वर्षीय दमित्री यूखिन यांची मांजर २२ नोव्हेंबरला घरातून गेली होती. अशात तिचा शोध घेण्यासाठी दमित्री जंगलाकडे गेले. त्यांना काही वेळातच त्यांची मांजर सापडली सुद्धा. पण त्यांच्या मांजरी त्यांच्या पायावर कुठेतरी पंजा मारला आणि त्यामुळे त्यांचं रक्त वाहू लागतं होतं. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने सांगितलं की, रक्त निघत असल्याने त्यांची स्थिती बिघडली आणि काही मिनिटांमध्ये त्यांचा जीव गेला.
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, रात्री ११ वाजता ही घटना घडली. दमित्री हे डायबिटीसचे रूग्ण होते आणि त्यांना ब्लड क्लॉटिंगची समस्या होती. अशात मांजरीने केलेली जखम त्यांच्या जीव जाण्याचं कारण ठरली. सोबत असलेल्या लोकांनी इमरजन्सी सर्व्हिसला फोनही केला. पण अॅम्बुलन्स पोहोचेपर्यंत त्यांचा जीव गेला होता. मांजर बरीच मोठी आणि तिने पंजाने मारल्याने झालेला घावही मोठा व खोलवर होता. त्यामुळे ब्लीडिंग थांबतच नव्हतं. परिवार आणि शेजाऱ्यांनी सांगितलं की, दमित्री त्यांच्या मांजरीवर खूप प्रेम करायचे. अशात त्यांना या घटनेची अपेक्षा अजिबात नव्हती.