पतीला घटस्फोट देऊन सावत्र मुलासोबत केलं लग्न, नंतर त्याच्या बाळालाही दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:44 PM2022-08-15T12:44:30+5:302022-08-15T12:45:24+5:30
Weird News : 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, रशियाची राहणारी 37 वर्षीय मरीना बलमशेवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने दोन वर्षाआधी दुसरं लग्न केलं तेव्हा ती चर्चेत आली.
Weird News : असं म्हणतात की, जोड्या देवाच्या घरीच तयार होतात. पण कधी कधी अशा काही घटना घडतात ज्या पाहिल्यावर हे जोड्यांबाबतची मान्यता खोटी वाटू लागते. रशियातील एका कपलमुळे हे जाणवतं. इथे एका महिलेने आपल्या पतीला घटस्फोट देऊन सावत्र मुलासोबत लग्न केलं. इतकंच नाही तर ती आता सावत्र मुलाच्या बाळाची आई सुद्धा झाली आहे.
2 वर्षाआधी केलं होतं लग्न
'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, रशियाची (Russia) राहणारी 37 वर्षीय मरीना बलमशेवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने दोन वर्षाआधी दुसरं लग्न केलं तेव्हा ती चर्चेत आली. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा दुसरा नवरदेव. तिने ज्याच्यासोबत दुसरं लग्न केलं तो तिचा 23 वर्षांचा सावत्र मुलगा ब्लादिमीर शेवरिन होता. मरीना म्हणाली की, पती एलेक्सी शेवरिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती सावत्र मुलगा ब्लादिमीरच्या प्रेमात पडली. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
10 वर्षाने पतीपासून घेतला घटस्फोट
मरीनाने ब्लादिमीरसोबतच्या प्रेमातबाबत सांगितलं की, ती ब्लादिमीरला 2007 मध्ये एलेक्सीसोबत लग्न केल्यानंतर भेटली होती. त्यावेळी ब्लादिमीर हा केवळ 7 वर्षांचा होता. तेव्हा ती त्याची सावत्र आई होती. लग्नाच्या 10 वर्षांनंतर मरीनाने एलेक्सीसोबत घटस्फोट घेतला. काही वर्षांनी मरीना ब्लादिमीरच्या प्रेमात पडली आणि मग घटस्फोटाच्या तीन 3 वर्षांनंतर तिने सावत्र मुलगा ब्लादिमीरसोबत लग्न केलं.
मरीना सांगते की, ब्लादिमीरसोबत लग्न करतेवेळी तिचं वजन फार जास्त होतं. त्यामुळे तिने स्वत:त बदल करण्याचा विचार केला. तिने वजन कमी करणं सुरू केलं. इतकंच नाही तर आकर्षक दिसण्यासाठी तिने काही प्लास्टिक सर्जरी सुद्धा केल्या. मरीनाचे इन्स्टाग्रामवर 6 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती यावर नेहमीच पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नेन्सीबाबत माहिती दिली होती. आता तिने एका बाळाला जन्मही दिला आहे.