अचानक पेट्रोलची १५ रुपये प्रतिलीटर दराने विक्री; लोकांनी टाकी फुल केली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:35 PM2022-06-15T13:35:49+5:302022-06-15T13:37:09+5:30

अनेकांनी पेट्रोल पंपाच्या चुकीचा फायदा घेतला. त्यामुळे पेट्रोल पंप चालकाला १२ लाख ५० हजारांचे नुकसान सहन करावे लागले.

Sale at Rs 15 per liter at petrol pump due to a mistake made by the manager | अचानक पेट्रोलची १५ रुपये प्रतिलीटर दराने विक्री; लोकांनी टाकी फुल केली, मग...

अचानक पेट्रोलची १५ रुपये प्रतिलीटर दराने विक्री; लोकांनी टाकी फुल केली, मग...

Next

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भारतात तर काही ठिकाणी पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अलीकडेच पेट्रोल १२० रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहचले होते. रशिया-यूक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम पेट्रोल डिझेल दरवाढीवर झाला आहे. तुम्ही कधी पेट्रोल पंपावर गेला तर तुम्हाला त्याठिकाणी मोठ्या अक्षरात पेट्रोल-डिझेलचे दर लिहिलेले असतात. परंतु एका पेट्रोल पंपाला त्याने केलेल्या एका चुकीचा फटका बसला आहे.

पंपचालकाच्या एका चुकीमुळे पेट्रोल पंपावर लोकांना १३५ रुपये प्रती लीटर ऐवजी १५ रुपये प्रती लीटर पेट्रोल मिळालं. अनेकांनी पेट्रोल पंपाच्या चुकीचा फायदा घेतला. त्यामुळे पेट्रोल पंप चालकाला १२ लाख ५० हजारांचे नुकसान सहन करावे लागले. या चुकीचा फायदा २०० हून अधिक वाहन चालकांनी घेतला. मात्र या चुकीमुळे पेट्रोल पंप मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकलं. मॅनेजरच्या चुकीमुळे ५० लीटर टाकी फूल करण्यासाठी केवळ ७५० रुपये लोकांना द्यावे लागले. ही टाकी फूल करण्यासाठी जवळपास ६ हजार ७५० रुपये खर्च येतो. 

ही घटना अमेरिकेच्या नॉर्थ कॅलिफोर्निया येथील आहे. याठिकाणी रेंचो कोर्डोवा शेल गॅस स्टेशनचे मॅनेजर जॉन स्जेसीना यांच्या हातून ही चूक घडली. ते म्हणाले की, चुकीने त्यांच्याकडून डेसीमल चुकीच्या जागी लागला. त्यामुळे त्याठिकाणी पेट्रोल ५०१ रुपये प्रति गॅलन विक्री होऊ लागली. अमेरिकेत अनेक पेट्रोल पंपावर सेल्फ सर्व्हिस व्यवस्था असते ज्याठिकाणी लोक स्वत: हून पेट्रोल भरतात. मी स्वत: प्राइस लिस्ट लावली होती. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. मी चूक केली असं जॉननं एबीसी न्यूजला सांगितले. 

जॉनच्या एका चुकीमुळे पेट्रोल पंपचालकाला भारी नुकसान सहन करावं लागलं. मोठ्या संख्येने वाहन चालकांना पेट्रोलच्या दरात कमी पाहून टाकी फूल करून घेतली. त्यामुळे पेट्रोल पंप मालकाला १२ लाख ५० हजारांचा आर्थिक भूर्दंड बसला. पंप मालकाने आपल्याविरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी जॉन चिंतेत होता. मात्र एका चुकीमुळे जॉनला पंप मालकाला झालेली नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. कॅलिफोर्नियात लोक पेट्रोलसाठी राष्ट्रीय पातळीवरील किंमतीपेक्षा जास्त पैसे देतात. याठिकाणी पेट्रोल किंमत प्रति गॅलन ५०१ रुपये आहे. १ गॅलन ३.७ लीटर पेट्रोल असतं. अमेरिकेत मागील काही महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. 

Web Title: Sale at Rs 15 per liter at petrol pump due to a mistake made by the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.