२०० रुपयांच्या अंगठीची ५.४५ कोटी रुपयांना विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 02:01 AM2017-06-13T02:01:58+5:302017-06-13T02:01:58+5:30

बहुतांश लोक गुंतवणूक म्हणून दागिन्यांची खरेदी करतात. मात्र, दागिन्यांचा एवढा प्रचंड परतावा मिळाल्याचे तुमच्या ऐकिवात नसेल.

Sales of Rs. 200 worth of Rs. 5.45 crores | २०० रुपयांच्या अंगठीची ५.४५ कोटी रुपयांना विक्री

२०० रुपयांच्या अंगठीची ५.४५ कोटी रुपयांना विक्री

Next

नवी दिल्ली : बहुतांश लोक गुंतवणूक म्हणून दागिन्यांची खरेदी करतात. मात्र, दागिन्यांचा एवढा प्रचंड परतावा मिळाल्याचे तुमच्या ऐकिवात नसेल. लंडनमध्ये राहणाऱ्या महिलेला २०० रुपयांत घेतलेल्या अंगठीचे तब्बल ५ कोटी ४६ लाख रुपये मिळाले.
या महिलेने रुग्णालयाच्या कार बूट सेलमधून २०० रुपयांना अंगठी विकत घेतली होती. अंगठी आवडल्यामुळे तिने ती दररोज घातली. अंगठीतील हिरा अस्सल असल्याचे तिला ठाऊक नव्हते. ३७ वर्षांनंतर अंगठीतील हिरा अस्सल असल्याचे कळले. तेव्हा तिचा यावर विश्वासच बसला नाही. स्थानिक सराफा व्यापाऱ्याकडे तिने चौकशी केली. तेव्हा हा हिरा अस्सल असल्याचे आणि त्याची अंदाजे किंमत २,५०,००० पौंड ते ३,००,००० पौंडाच्या घरात असल्याचे समजले. या अंगठीतील हिऱ्यावर जुन्या पद्धतीप्रमाणे पैलू पाडण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर पडणारा प्र्रकाश परावर्तित होत नव्हता. सामान्यपणे हिऱ्याबाबत असे होत नाही. यानंतर दागिन्यांचा लिलाव करणाऱ्या एका संस्थेने या महिलेशी संपर्क साधून ही अंगठी लिलावात ठेवली. तेव्हा २०० रुपयांच्या या अंगठीला ५.४६ कोटी रुपयांची किंमत मिळाली.

Web Title: Sales of Rs. 200 worth of Rs. 5.45 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.