'क्वालिटी फूड'च्या नावावर रेस्टोरंटने आकारले 1.3 कोटी रुपये; ग्राहकाने नेमकं काय खाल्लं..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 07:03 PM2022-11-20T19:03:14+5:302022-11-20T19:03:40+5:30

लोकप्रिय शेफ नुस्र अतने ग्राहकाकडून तब्बल 1.3 कोटी रुपये आकारले. बिलाचा फोटोही त्याने शेअर केला.

salt bae restaurant charge 1point3 crore bill from a customer for so called quality food | 'क्वालिटी फूड'च्या नावावर रेस्टोरंटने आकारले 1.3 कोटी रुपये; ग्राहकाने नेमकं काय खाल्लं..?

'क्वालिटी फूड'च्या नावावर रेस्टोरंटने आकारले 1.3 कोटी रुपये; ग्राहकाने नेमकं काय खाल्लं..?

googlenewsNext

Most Expensive Restaurant: जगभरात आपल्या महाग अन्नामुळे प्रसिद्धी मिळवलेला लोकप्रिय शेफ 'Salt Bae' म्हणजेच नुस्र अत कोक्सेने त्याच्या अबू धाबीमधील रेस्टोरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकाकडून कोट्यवधी रुपये आकारले. ग्राहकाला दिलेले बिल त्याने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, अनेकजण त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी किडनी विकावी लागेल, अशीही प्रतिक्रिया काहींनी दिली.

जितक्या रुपयांमध्ये संपूर्ण कुटुंबाचे जेवण होऊ शकते, तितक्या रुपयांमध्ये नुस्र अतच्या हॉटेलमध्ये (Salt Bae’s Nusr-et) फक्त एक कबाब मिळतो. तुर्कीमध्ये जन्म झालेल्या शेफ नुसरत गोक्से (Nusret Gökçe ) ने या रेस्टोरंटची सुरुवात केली. पण, त्याच्या अन्नाऐवजी बिलची सर्वत्र चर्चा होत असते. या वेळेस हद्दच झाली, जेव्हा त्याने एका ग्राहकाकडून कोट्यवधी रुपयांचे बिल आकारले.

नुकतच त्याने आपल्या रेस्टोरंटमध्ये आलेल्या ग्राहकाकडून आकारलेल्या बिलाची कॉपी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावर काहींनी किडनी विकावी लागेल, रेशन चंद्रावरुन येतं का, अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, नुस्र अतने त्याच्या रेस्टोरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकाकडून AED 615,065 म्हणजेच सूमारे 1.3 कोटी रुपये आकारले. तुम्हीही विचार करत असाल, की या ग्राहकाने नेमकं काय खाल्लं असेल....

शेफने त्याच्या अकाउंटवरुन 17 नोव्हेंबर 2022 ला बिल शेअर केले. त्यातून समजले की, ग्राहकाने जगातील सर्वात महाग मद्यापैकी असलेली वाइन ऑर्डर केली होती. याशिवाय, फ्रेंच फ्राइज आणि रेस्टोरंटमधील काही लोकप्रिय डिशेज मागवली होती. याचे बिल 1.3 कोटी रुपये झाले. या पोस्टसोबत शेफने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गुणवत्ता कधीच महाग नसते.’
 

Web Title: salt bae restaurant charge 1point3 crore bill from a customer for so called quality food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.