पहिल्यांदा पुरूषांसाठी तयार केले होते सॅनिटरी पॅड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:53 AM2019-05-12T00:53:49+5:302019-05-12T00:54:03+5:30

माय पिरिअड या ब्लॉगने दिलेल्या एका पोस्टनुसार, सर्वात आधी सॅनिटरी पॅटचा वापर पहिल्या महायुद्धादरम्यान केला गेला होता.

 Sanitary pad was made for men for the first time! | पहिल्यांदा पुरूषांसाठी तयार केले होते सॅनिटरी पॅड!

पहिल्यांदा पुरूषांसाठी तयार केले होते सॅनिटरी पॅड!

Next

माय पिरिअड या ब्लॉगने दिलेल्या एका पोस्टनुसार, सर्वात आधी सॅनिटरी पॅटचा वापर पहिल्या महायुद्धादरम्यान केला गेला होता. फ्रान्सचा नर्सनी पहिल्या महायुद्धावेळी जखमी सैनिकांचं वाहणारं रक्त रोखण्यासाठी पहिल्यांदा हे पॅड तयार केले होते. असे सांगतात की, हे नॅपकिन बेंजमिन फ्रेंकलिन यांनी एका आविष्कारातून प्रेरित होऊन तयार केले होते.
त्यावेळी हे नॅपकिन तयार करताना काळजी घेण्यात आली होती की, याने सहजपणे रक्त शोषलं जावं आणि एकदा वापर केल्यावर याला सहजपणे नष्ट करता यावं. जेव्हा फ्रान्सच्या सैनिकांसाठी सॅनिटरी पॅड तयार करण्यात आले, तेव्हा फ्रान्समध्ये काम करणाऱ्या अमेरिकन नर्सनी यांचा वापर मासिक पाळीदरम्यान करणे सुरू केले.
१८८८ मध्ये कॉटेक्स नावाच्या कंपनीने युद्धात प्रयोग केल्या गेलेल्या आधारावरच ‘सॅनिटरी टॉवल्स फॉर लेडीज’ नावाने सॅनिटरी पॅडचं निर्माण सुरू केलं. १८८६ मध्ये या आधी जॉनसन अँड जॉनसनने लिस्टर्स टॉवल्स नावाने डिस्पोजबल नॅपकिन्स तयार करण्यास सुरुवात केली.
हे नॅपकिन्स रुईप्रमाणे दुसºया फायबरला अब्जॉर्बेट लायनरने कव्हर करून तयार केले जात होते, पण हे त्यावेळी इतके महाग होते की, महिला त्या खरेदी करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी केवळ श्रीमंत घरातील महिलाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत होत्या. सामान्य याचा विचारही करू शकत नव्हत्या. काळानुसार सॅनिटरी नॅपकिनच्या रूपात बराच बदल झाला. हळूहळू हे सामान्य महिलांसाठीही उपलब्ध होऊ लागले, पण आजही भारतात अनेक महिलांकडे सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे त्या त्यांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी याचा वापर करू शकत नाहीत.
आजही सॅनिटरी नॅपकिनकडे किंवा मासिक पाळीकडे आपला समाज चांगल्या नजरेने बघत नाही. आजही यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. लोक आजही मासिक पाळी शब्द उच्चारला तरी अवघडतात. इतकंच काय तर आपल्याच शारीरिक प्रक्रियेबाबत महिला बिनधास्तपणे बोलू शकत नाहीत.

सॅनिटरी पॅड्सचं नाव
ऐकताच आजही लोक नात-तोंड वाकडं करू लागतात. कारण हा याचा संबंध महिलांच्या मासिक पाळीशी आहे. त्यामुळे समाज सॅनिटरी पॅड्सला महिलांचीच वस्तू आहे, असं मानतो. महिलांसमोर सॅनिटरी पॅडचं नाव घेताना लाज वाटणाºया पुरुषांना हे माहीत नाही की, पहिल्यांदा हे पॅड महिलांसाठी नाही, तर पुरुषांसाठी तयार करण्यात आले होते.

Web Title:  Sanitary pad was made for men for the first time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.