आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:52 PM2021-02-17T18:52:16+5:302021-02-17T19:00:10+5:30

Saudi arabia princess latifa : राजकुमारी लतीफानं आलिशान विला जेलच्या बाथरूमध्ये बसून व्हिडीओ शूट केला आहे. 

Saudi arabia princess latifa is hostage in her own country and now sheseen in video from abandoned villa | आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

googlenewsNext

दुबईची राजकुमारी लतीफा मक्तूम गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या राजकुमारीचा एका व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे. बीबीसी पेनोरेमानं लतीफाचे काही व्हिडीओ मॅसेज शेअर केले आहेत. राजकुमारी लतीफानं आलिशान विला जेलच्या बाथरूमध्ये बसून व्हिडीओ शूट केला आहे. 

३५ वर्षीय लतीफा म्हणते की, ''मला कैद करून ठेवण्यात आलं आहे. सगळ्या खिडक्या बंद असून मी उघडूसुद्धा शकत नाही.  ताजी हवा खाण्यासाठी मी बाहेरही जाऊ शकत नाही. मला माझ्या सुरक्षेची आणि आयुष्याची चिंता नेहमी असते. मी जीवंत वाचेन की नाही याची मला कल्पना नाही. संपूर्ण आयुष्य मला जेलमध्ये राहावे लागेल. अशी धमकी  पोलिसांनी दिली असून मला इथून माझी सुटका करायची  आहे. ''

"Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्... 

राजकुमारी लतीफा

रिपोर्टनुसार, प्रिसेंस लतीफा विला जेलमध्ये जवळपास ३० पोलिसांच्या सुरक्षेत आहे. लतीफाची मैत्रिण  टीनाने बीबीसीशी बोलताना सांगितले की, ''ती खूप जास्त पिवळी पडली आहे.  किती महिन्यांपासून तिनं सुर्यप्रकाश पाहिलेला सुद्धा नाही. ती फक्त आपली खोली आणि किचनपर्यंत जाऊ शकते'' दरम्यान  २०१८ मध्ये लतीफानं देश सोडून  जाण्याचा प्रयत्न केला  होता. त्याचवेळी ती आपल्या फ्रान्सच्या मित्रासह गोव्याच्या समुद्राजवळ बेपत्ता झाली होती. 

Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...

आपल्याला किडनॅप करण्यात आलं आहे. अशी माहिती तिनं मेसेजच्या माध्यमातून दिली होती. यानंतर भारतीय सेनेला एक अज्ञात जहाज मिळालं होतं त्यात लतीफाला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर लतीफाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली होती. नंतर कळलं की तिनं स्वतःहून देश सोडला आणि  इतर देशांमध्ये शरणार्थी म्हणून राहणार होती. 
 

Web Title: Saudi arabia princess latifa is hostage in her own country and now sheseen in video from abandoned villa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.