जगातल्या सर्वात महाग घरात थांबलाय सौदी प्रिन्स, किंमत इतकी की लाखो लोक अनेक दिवस जेऊ शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:44 PM2022-07-29T12:44:00+5:302022-07-29T12:56:31+5:30

World's Most Expensive House: हे जगातलं सर्वात महागडं घर The Chateau Louis XIV पॅरिस शहराच्या बाहेरील भागात आहे. याला वर्साय पॅलेससारखं तयार करण्यात आलं आहे. जे कधीकाळी फ्रेन्च रॉयल फॅमिलीचं होतं.

Saudi prince Mohammed Bin Salman stays in world most expensive home in paris | जगातल्या सर्वात महाग घरात थांबलाय सौदी प्रिन्स, किंमत इतकी की लाखो लोक अनेक दिवस जेऊ शकतील!

जगातल्या सर्वात महाग घरात थांबलाय सौदी प्रिन्स, किंमत इतकी की लाखो लोक अनेक दिवस जेऊ शकतील!

googlenewsNext

World's Most Expensive House: सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Saudi Prince Mohammed bin Salman) सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. तो फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रोची भेट घेईल.  सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हा त्याच्या लक्झरी लाइफसाठी प्रसिद्ध आहे आणि फ्रान्समध्ये तो जगातल्या सर्वात महागड्या घरात थांबला आहे. पॅरिसमध्ये असलेलं हे घर सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याने  2015 मध्ये खरेदी केलं होतं. 

हे जगातलं सर्वात महागडं घर The Chateau Louis XIV पॅरिस शहराच्या बाहेरील भागात आहे. याला वर्साय पॅलेससारखं तयार करण्यात आलं आहे. जे कधीकाळी फ्रेन्च रॉयल फॅमिलीचं होतं. मोहम्मद बिन सलमानने हे घर 2015 मध्ये 300 मिलियन डॉलर म्हणजे साधारण 23 अब्ज 88 कोटी 93 लाख रूपयांना खरेदी केलं होतं. असं मानलं जातं की, हे घर जगातील सर्वात महागडं घर आहे.

सीबीएस न्यूजमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जगातील सर्वात महादगडं हे घर 7 हजार स्क्वेअर मीटर परिसरात बांधलं आहे. सौदी प्रिन्स सलमानच्या या घराची किंमत इतकी आहे की, लाखो लोक अनेक दिवस दोन वेळचं जेवण करू शकतं. जगातल्या सर्वात महागड्या मानल्या जाणाऱ्या या घरात नाइट क्लब, कारंजे, एक सिनेमा हॉल, काचेचे चेंबर अशा अनेक सुविधा आहेत. या घराचं निर्माण 2009 साली 19व्या शतकातील एका महालाला तोडल्यानंतर करण्यात आलं होतं. 

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान जगतील सर्वात महागड्या मानल्या जाणाऱ्या ज्या घराचा मालक आहे त्याचं निर्माण दिवंगत पत्रकार जमाल खशोगीचा भाऊ इमाद खशोदीने केलं होतं. इमाद खशोगी फ्रान्समध्ये लक्झरी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट बिझनेस करतो.

दरम्यान 2018 मध्ये पत्रकार जमाल खशोगीच्या हत्येनंतर आरोपी म्हणून सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमानचं नाव समोर आलं होतं. आरोप होता की,  सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या आदेशावरूनच जमाल खशोगीची हत्या केली.

Web Title: Saudi prince Mohammed Bin Salman stays in world most expensive home in paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.