जगातला सगळ्यात मूर्ख माणूस! चोरांना सोपवली आयुष्यभराची कमाई, मग बॅंकेला आग लावून गेला तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:09 AM2023-02-13T10:09:28+5:302023-02-13T10:11:49+5:30

Scammers Took Lifetime Savings of Man: रशियात राहणाऱ्या या व्यक्तीला फसणूक करणाऱ्या काही लोकांनी मूर्ख बनवलं आणि त्याची सगळी कमाई आपल्या नावावर केली. नंतर त्याला बॅंकेला आग लावण्यासाठी तयार केलं.

Scammers convince man to handover them lifetime savings and set fire to bank | जगातला सगळ्यात मूर्ख माणूस! चोरांना सोपवली आयुष्यभराची कमाई, मग बॅंकेला आग लावून गेला तुरूंगात

जगातला सगळ्यात मूर्ख माणूस! चोरांना सोपवली आयुष्यभराची कमाई, मग बॅंकेला आग लावून गेला तुरूंगात

Next

Scammers Took Lifetime Savings of Man: अनेक लोक पैसा कमावतात आणि ते जमा करतात. पण ते सुरक्षित ठेवण्यात वेगवेगळ्या अडचणी येतात. इतकंच काय तर या काळातही लोक इतरांवर लगेच विश्वास ठेवतात आणि फसतात. असं एका व्यक्तीसोबत झालं आणि त्याने आयुष्यभराची कमाई दुसऱ्याला देऊन स्वत: कंगाल झाला. 

रशियात राहणाऱ्या या व्यक्तीला फसवणूक करणाऱ्या काही लोकांनी मूर्ख बनवलं आणि त्याची सगळी कमाई आपल्या नावावर केली. नंतर त्याला बॅंकेला आग लावण्यासाठी तयार केलं.  पोलिसांनी जेव्हा ही कहाणी ऐकली तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. फसवणूक झालेल्या व्यक्तीचं वय 48 होतं. 

पोलिसांनी या व्यक्तीला मॉस्कोच्या रूजा नावाच्या शहरातून अटक केली. त्याच्यावर आरोप आहे की, रशियाची राजधानी मॉस्कोच्या Sberbank च्या ब्रांचमध्ये त्याने दारूच्या माध्यमातून आग लावली. बॅंक कर्मचाऱ्यांनी वेळीच ही आग विझवली. पण पोलिसांना जेव्हा यामागची कहाणी समजली तेव्हा त्यांचाही विश्वास बसला नाही. व्यक्तीने सांगितलं की, त्याला कुणाचा तरी फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की, तो बॅंक प्रतिनिधि आहे. त्यांनी या व्यक्तीला विश्वास दिला की, त्याच्या अकाऊंटमधील पैसे चोरी होऊ शकतात. अशात ते दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर करावे लागतील.

काही दिवसातच व्यक्तीने त्याच्याकडील लाखो रूपयांची रक्कम काही अकाऊंट्समध्ये ट्रांसफर केली. इतकंच नाही तर पैसे मिळताच फसवणूक कऱणाऱ्यांनी फोन बंद केला. इतके ही व्यक्ती पैशांमुळे चिंतेत होती. यादरम्यान त्या लोकांनी या व्यक्तीला भडकवलं आणि म्हणाले की, बॅंकेत बसलेल्या लोकांना धडा शिकवला पाहिजे. जे त्याचे पैसे हडपणार होते. त्यांनी या व्यक्तीला बॅंकेला आग लावण्याचा सल्ला दिला आणि या मूर्ख व्यक्तीने तसं केलं सुद्धा. पोलीस त्याची ही कहाणी ऐकून हैराण झाले. 

Web Title: Scammers convince man to handover them lifetime savings and set fire to bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.