16 व्या वर्षी शाळा सोडली, 18 व्या वर्षी आई झाली... आता कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 05:17 PM2022-11-20T17:17:07+5:302022-11-20T17:27:40+5:30
चार आलिशान घरांची मालकीण असून सध्या त्याची किंमत तब्बल दहा कोटींहून अधिक आहे.
एका महिलेने वयाच्या 16 व्या वर्षी शाळा सोडली, 18 व्या वर्षी आई झाली. ही महिला आता कोट्यवधींची मालकीण झाली आहे. ती चार आलिशान घरांची मालकीण असून सध्या त्याची किंमत तब्बल दहा कोटींहून अधिक आहे. रशेल ओलिंगटन असं या महिलेचं नाव आहे. द सन सोबत संवाद साधताना तिने आपल्या या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं घर घेतल्याचं म्हटलं आहे.
2005 मध्ये रशेलने एसेक्सच्या विकफोर्डमध्ये 1.7 कोटींचं घर घेतलं, सध्या त्याची किंमत ही साडे चार कोटी आहे. रशेल आता 40 वर्षांची असून तिला एबी, एरिन आणि एडन या नावाची तीन मुलं आहेत. 25 वर्षांची असताना ती तिचा पती माइकला भेटली. त्यांच्या आवडी-निवडी सेम होत्या. त्यानंतर दोघांनी सेविंग सुरू केली. पहिलं घर घेण्यासाठी रशेलच्या पतीने आपली कार देखील विकली. तिने वयाच्या 23 व्या वर्षी दुसरं तर 24 व्या वर्षी तिसरं घर घेतलं आहे. रशेल आणि तिच्या पतीने लिंकनशायरमध्ये गेल्या आठवड्य़ात नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
रशेलने दिलेल्या माहितीनुसार, ती चार आलिशान घरांची मालकीण आहे. तिच्या प्रॉपर्टीची किंमत 9.3 कोटींहून अधिक आहे. तिने याआधी 5.57 कोटी रुपयांना विकत घेतली होती. आता त्याची किंमत वाढली आहे. रशेलने ती इस्टेट एजन्सीचा बिझनेस चालवू शकते असं म्हटलं आहे. पण मंदीमुळे ते थोडं अवघड आहे. पण तिला ते करायचं असल्याचं ती सांगते. जेणेकरून ती लोकांना तिच्यासारखं होण्यासाठी मदत करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"