शाळेची फी दीड क्विंटल धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 12:57 AM2017-05-31T00:57:22+5:302017-05-31T00:57:22+5:30
सध्या शाळांची फी एवढी वाढली आहे की, पालकांना ही फी भरताना अनेक कसरती कराव्या लागतात. मात्र, मध्यप्रदेशातील धार
धार : सध्या शाळांची फी एवढी वाढली आहे की, पालकांना ही फी भरताना अनेक कसरती कराव्या लागतात. मात्र, मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील ही शाळा याला अपवाद आहे. या शाळेची फी आहे दीड क्विंटल धान्य आणि दहा किलो डाळ. आदिवासी मजुरांची मुले या शाळेत शिक्षण घेतात. ककराना येथील राणी काजल जीवन शाळेत सध्या २१३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आठवीपर्यंतच्या या शाळेत ग्रंथालय आणि संगणकही आहेत. शाळेचे संचालक केमत गवले सांगतात की, विद्यार्थ्यांकडून अतिशय किमान धान्य घेतले जाते. आजूबाजूच्या गावातील अनेक मुलांना या शाळेचा मोठा आधार आहे. आपल्या मुलांना या शाळेत सोडून मजूर निश्चिंतपणे कामाला जातात. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय ही शाळा सुरू आहे.