Video - कौतुकास्पद! 'ही' शाळा फी ऐवजी मुलांकडून घेते प्लास्टिकच्या बाटल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:54 PM2023-10-13T15:54:43+5:302023-10-13T15:56:10+5:30
विटा, रस्ते आणि शौचालय बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातो. शाळेत मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात, यातून ते पैसेही कमावतात.
प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. याच दरम्यान एक शाळा तिच्या प्लास्टिकच्या पुनर्वापराच्या अनोख्या पद्धतीमुळे आघाडीवर आहे. नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलॉन्ग, जे विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी ओळखले जातात, त्यांनी अक्षर फाऊंडेशनची क्लिप शेअर केली, ही वंचित मुलांची शाळा आहे जी फी म्हणून फक्त प्लास्टिक आकारते. दर आठवड्याला विद्यार्थ्यांना 25 प्लास्टिकच्या बाटल्या आणाव्या लागतील.
व्हिडीओ शेअर करताना अलॉन्ग यांनी "जर हे तुम्हाला आश्चर्यचकित करत नसेल तर काय होईल?" असं म्हटलं आहे. 2016 मध्ये परमिता शर्मा आणि माझिन मुख्तार यांनी शाळेची स्थापना केली, तेव्हा त्यांनी दोन ज्वलंत समस्या पाहिल्या त्या म्हणजे अति कचरा आणि निरक्षरता. दोन्ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक शाळा तयार केली जिथे मुलं दर आठवड्याला प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून मोफत अभ्यास करू शकतात.
If this doesn't surprise you, what does?#Incredible_NorthEast
— Temjen Imna Along (@AlongImna) October 12, 2023
Credit: northeastview_ pic.twitter.com/6RO1SqhaNa
विटा, रस्ते आणि शौचालय बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातो. शाळेत मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात, यातून ते पैसेही कमावतात. अभ्यासाव्यतिरिक्त, विद्यार्थी भाषा, प्लास्टिक रिसायकलिंग, सुतारकाम, बागकाम आणि बरंच काही शिकतात. शाळेचा ड्रॉप रेट शून्य टक्के आहे.
लोक या कल्पनेने प्रभावित झाले आणि त्यांनी शिक्षण आणि टिकाव या दोन्हीसाठी मार्ग प्रशस्त करणाऱ्या अभूतपूर्व उपक्रमाबद्दल या जोडप्याचे कौतुक करताहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं की, "हा ईशान्येचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे." आमचा भाऊ खूप हुशार आहे. छान काम मित्रा." दुसऱ्याने "अतुल्य भारत, देव त्यांना आशीर्वाद देवो" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.