VIDEO : पुन्हा लाल झालं या नदीचं पाणी, अद्भुत नजारा पाहून अवाक् झाले लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:56 AM2023-04-03T09:56:04+5:302023-04-03T09:56:16+5:30
Cusco River In Peru: हा फारच अद्भुत आणि दुर्मिळ नजारा आहे. ही नदी पेरूमधील लाल नदी आहे. ज्यातील पाणी लाल होतं. लोकांना विश्वास बसत नाही की, नदीचं पाणी लाल कसं होऊ शकतं.
Cusco River In Peru: जगभरात अनोख्या नद्या आहेत, त्यांच्या उगमाबाबत अनेक किस्से नेहमीच व्हायरल होत असतात. काही नद्यांमध्ये सोनं सापडतं तर काही नद्यांमध्ये किंमती धातु सापडतात. अशाच एका नदीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो बघून लोक अवाक् झाले आहेत. या व्हिडिओत एक नदी दिसत आहे ज्यात पाणी लाल रंगाचं दिसत आहे. अनेक लोक ही नदी बघून कन्फ्यूज झाले आहेत.
हा फारच अद्भुत आणि दुर्मिळ नजारा आहे. ही नदी पेरूमधील लाल नदी आहे. ज्यातील पाणी लाल होतं. लोकांना विश्वास बसत नाही की, नदीचं पाणी लाल कसं होऊ शकतं. सोशल मीडियावर सध्या या नदीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नदीचं नाव पुकामायु आहे. क्वेशुआ भाषेत पुकाचा अर्थ लाल होतो आणि मायूचा अर्थ नदी होतो. मान्यता आहे की, नदीमधील खनित तत्वांमुळे नदीचं पाणी लाल होतं. आयरन ऑक्साइडमुळे असं होतं. येथील डोंगरांमध्ये आढळणारे मिनरल्स आणि आयरन ऑक्साइड नदीतून वाहत जातात.
The red river in Cusco, Peru,
— Science girl (@gunsnrosesgirl3) March 31, 2023
flows crimson because of the iron oxide run offs from the local mountains in the rainy seasonpic.twitter.com/aar4Rq85Ec
इतकंच नाही तर असंही सांगण्यात येतं की, डोंगरात एकच नाही तर अनेक खजिन पदार्थ आहेत, ज्यामुळे असं होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, नदीजवळ जो डोंगर आहे तो लाल बलुआ दगडापासून बनला आहे आणि जेव्हा त्यावर पाणी पडतं तेव्हा तो अजून लाल होतो.