वैज्ञानिकाने रिसर्चसाठी ४० हजार वेळा सापाकडून करवून घेतला दंश, समोर आलं मोठं रहस्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:38 PM2024-05-24T16:38:37+5:302024-05-24T16:39:16+5:30
विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता.
सापाचं नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर शहारा येतो. बरेच लोक तर टीव्हीवर साप बघूनही घाबरतात. अशात त्यांच्यासमोर जर साप आला तर काय होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. साप दिसला तरी लोक घामाघुम होतात मग सापाने दंश केला तर काय होईल? विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकाने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता.
ब्राझीलबाबत असं सांगितलं जातं की, दरवर्षी २७ हजार लोक सापांच्या दंशाचे शिकार होतात. हे का आणि कसं होतं हे जाणून घेण्यासाठी ब्राझीलच्या एका वैज्ञानिकाने सापांवर रिसर्च केला आणि या रिसर्च दरम्यान 40,000 वेळा सापाकडून दंश करवून घेतला.
हा रिसर्च ब्राझीलच्या बूतनतन इंस्टिट्यूटचे रिसर्चर जाआओ मिगेल आल्वेस-नूनिस यांनी केला. महत्वाची बाब म्हणजे त्यानी एकाच प्रकारच्या सापाकडून दंश करवून घेतले. हे साप दक्षिण अमेरिकेतील विषारी जराराका साप आहेत. आल्वेस नूनिस असं करून जाणून घेत होते की, मनुष्यांना साप का दंश करतात.
आल्वेस नूनिस म्हणाले की, आतापर्यंत या सापाबाबत म्हटलं जात होतं की, हे तुम्हाला तेव्हाच दंश करतात जेव्हा तुम्ही त्यांना स्पर्श करता किंवा त्यांची छेड काढता. पण आमच्या रिसर्चमधून निष्कर्श वेगळे निघाले.
आमच्या रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, साप जेवढा लहान असेल, त्याचे मनुष्याला दंश करण्याची शक्यता तेवढीच वाढते. त्याशिवाय रिसर्चमधून हेही समोर आलं की, नर सापापेक्षा मादा साप जास्त आक्रामक असतात. तसेच असंही समजलं की, जर वातावरण जास्त उष्ण असेल तर सापांनी दंश करण्याची शक्यताही वाढते.