कोट्यावधी वर्षांआधी गायब झाले होते हे जीव, वैज्ञानिक पुन्हा करत आहे त्यांना जिवंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:37 AM2023-11-20T09:37:20+5:302023-11-20T09:37:39+5:30

आता वैज्ञानिकांची एक टीम असं काही करणार आहे, ज्याद्वारे एक लुप्त झालेला प्राणी पुन्हा जिवंत केला जाणार आहे. 

Scientists are experimenting to bring alive wooly mammoths deceased before years | कोट्यावधी वर्षांआधी गायब झाले होते हे जीव, वैज्ञानिक पुन्हा करत आहे त्यांना जिवंत!

कोट्यावधी वर्षांआधी गायब झाले होते हे जीव, वैज्ञानिक पुन्हा करत आहे त्यांना जिवंत!

मनुष्यांनी आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. हळूहळू अनेक गोष्टींचा शोध लावला आणि आपला विकास केला. जंगलातून सुरू झालेला हा प्रवास चंद्र, मंगळ ग्रहांपर्यंत पोहोचला आहे. विज्ञानाच्या माध्यमातून मनुष्यांनी अशा अशा गोष्टी मिळवल्या आहेत ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. आता वैज्ञानिकांची एक टीम असं काही करणार आहे, ज्याद्वारे एक लुप्त झालेला प्राणी पुन्हा जिवंत केला जाणार आहे. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, वैज्ञानिक एका अशा विशाल जीवाला जिवंत करणार आहेत जे कोट्यावधी वर्षाआधी पृथ्वीवर होते. पण वातावरणात बदल आणि अनुकूल परिस्थिती नसल्याने हे जीव पृथ्वीवरून गायब झाले होते. मनुष्यांनी कधीच या जीवांना पाहिलं नाही. केवळ त्यांच्या अवशेषांच्या आधारावर वैज्ञानिकांनी त्यांचा फोटो बनवला होता आणि त्यांना जिवंत करण्याचं मिशन हाती घेतलं.

आपण डायनासॉरपासून ते अनेक विशाल जीवांबाबत ऐकलं आहे, जे कधीकाळी पृथ्वीवर राहत होते. आता वैज्ञानिकांनी वूली मॅमथ नावाच्या जीवाला जिवंत करण्याचं काम हाती घेतलं आहे. बर्फाळ प्रदेशात मिळालेल्या यांच्या फ्रोजन डीएनएच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मनुष्य पुन्हा या जीवाला बघू शकतील. हा प्राणी हत्तीची एक प्रजाती आहे. सायंटिस्ट यांच्या डीएनएला आशियातील हत्तीसोबत मिक्स करून एका पिल्लाला जन्म देण्याचा प्लान करत आहेत. बायोटेक कंपनी कोलोसल बायोसायन्सच्या वैज्ञानिकांचा दावा आहे की, 2028 पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल.

या कंपनीच्या वेबसाइटनुसार, मॅमुथचं भ्रूण सरोगेट हत्तीणीच्या पोटात प्लांट केलं जाईल. ज्याद्वारे पिल्लू या जगात येईल. या प्रयोगाला अनेकांनी विरोधही केला आहे. त्यांचं मत आहे की, क्लोनिंगच्या माध्यमातून अशा जीवांना जिवंत करणं घातक ठरू शकतं. असे जीव पृथ्वीवर पुन्हा येऊन नुकसान करू शकतात.

Web Title: Scientists are experimenting to bring alive wooly mammoths deceased before years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.