खूशखबर! वैज्ञानिकांनी तयार केला जगातला पहिला 'बायोनिक' डोळा, दृष्टीहिनांना बघता येणार जग...

By अमित इंगोले | Published: October 1, 2020 01:15 PM2020-10-01T13:15:31+5:302020-10-01T13:19:20+5:30

आता हा डोळा मनुष्यावर लावण्याची तयार सुरू आहे. असा दावा केला जात आहे की, हा जगातला पहिला बायोनिक डोळा आहे.

Scientists created worlds first bionic eye which will remove congenital blindness preparations to put it in brain | खूशखबर! वैज्ञानिकांनी तयार केला जगातला पहिला 'बायोनिक' डोळा, दृष्टीहिनांना बघता येणार जग...

खूशखबर! वैज्ञानिकांनी तयार केला जगातला पहिला 'बायोनिक' डोळा, दृष्टीहिनांना बघता येणार जग...

googlenewsNext

ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीनंतर Bionic Eye म्हणजेच एक कृत्रीम डोळा तयार केलाय. या डोळ्याच्या मदतीने दृष्टीहीनता दूर होणार आहे. या डोळ्याची ट्रायलही झाली आाहे. आता हा डोळा मनुष्यावर लावण्याची तयार सुरू आहे. असा दावा केला जात आहे की, हा जगातला पहिला बायोनिक डोळा आहे.

thelogicalindian.com ने दिलेल्या वृत्तानुसार, यूनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक लाओरी यांनी सांगितले की, 'आम्ही एक अशी वायरलेस ट्रान्समीटर चीप तयार केली आहे. जी डोक्याच्या पृष्ठभागावर फिट केली जाईल. आम्ही याला 'बायोनिक आय' असं नाव दिलं आहे. यात कॅमेरासोबत एक हेडगिअर फिट करण्यात आलाय. जो आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवून थेट मेंदूशी संपर्क करेल.

हा अनोखा डोळा तयार करण्यासाठी १० वर्षांपेक्षा जास्तचा काळ लागला आहे. प्राध्यापक लाओरी यांच्यानुसार, बायोनिक डोळा जन्मताच नेत्रहीन व्यक्तीला लावला जाऊ शकतो. संशोधकांनी डिवाइस विकण्यासाठी फंडची मागणी केली आहे. दरम्यान गेल्या वर्षी संशोधकांना ७.३५ कोटी रूपयांचा फंड दिला गेला होता.

मोनाश बायोमेडिसिन डिस्कवरी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर यान वॉंग यांच्यानुसार, शोधादरम्यान १० डिवाइस प्रयोग मेंढ्यांवर करण्यात आला होता. यातील ७ डिवाइस मेंढ्यांच्या आरोग्याला कोणतंही नुकसान न पोहोचवता ९ महिने अॅक्टिव राहिले. दुसरीकडे डॉ. ल्यूस म्हणाले की, जर हे डिवाइस सक्सेस झालं तर मोठ्या प्रमाणात तयार केलं जाईल. 
 

Web Title: Scientists created worlds first bionic eye which will remove congenital blindness preparations to put it in brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.