सूर्य कधी अन् केव्हा नष्ट होईल, मनुष्याला हे पाहता येणार? वैज्ञानिकांचा हैराण करणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:37 PM2021-09-05T18:37:04+5:302021-09-05T18:38:35+5:30

सुरुवातीला सूर्य नष्ट झाल्यास सौरमंडळात नेबुला तयार होईल असं समोर आलं होतं. ज्यात सर्व ग्रह-तारे तुटून गॅस आणि दगडाच्या रुपात एकत्र भ्रमण करतील अथवा विखुरले जातील. परंतु आता बारकाईनं अभ्यास केल्यास त्याचा निष्कर्ष यापेक्षा भयानक आणि अंगावर काटा आणणारा आहे

Scientists Figured Out How And When Our Sun Will Die | सूर्य कधी अन् केव्हा नष्ट होईल, मनुष्याला हे पाहता येणार? वैज्ञानिकांचा हैराण करणारा खुलासा

सूर्य कधी अन् केव्हा नष्ट होईल, मनुष्याला हे पाहता येणार? वैज्ञानिकांचा हैराण करणारा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देअंतराळ वैज्ञानिकांच्या एका टीमने २०१८ मध्ये एक थेअरी दिली होती ती म्हणजे सूर्य नष्ट झाल्यास सौरमंडळ नेबुलामध्ये बदल होईलसूर्याचं केंद्र संकुचित होऊन नष्ट होईल अथवा छोटं होईल. ज्यात सूर्य उष्णता निर्माण करण्याची क्षमता संपुष्टात येईलअलबर्ट यांच्या टीममधील वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या ग्रहांच्या वयाबाबत शोध घेण्यासाठी गणितीय मॉडेल बनवलं आहे.

काय होईल जेव्हा सूर्य नष्ट होईल? कसं दिसेल ते? आपल्या सौरमंडळ, पृथ्वी, जीव-जंतू जिवंत राहतील? यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरं वैज्ञानिकांनी शोधून काढली आहेत. आपला सूर्य कधी आणि कसा नष्ट होईल. त्यानंतर सौर मंडळाचं काय होईल? पृथ्वीचं काय होईल असे विविध प्रश्नावर वैज्ञानिक रिसर्च करत होते. सुरुवातीला सूर्य नष्ट झाल्यास सौरमंडळात नेबुला तयार होईल असं समोर आलं होतं. ज्यात सर्व ग्रह-तारे तुटून गॅस आणि दगडाच्या रुपात एकत्र भ्रमण करतील अथवा विखुरले जातील.

परंतु आता बारकाईनं अभ्यास केल्यास त्याचा निष्कर्ष यापेक्षा भयानक आणि अंगावर काटा आणणारा आहे. अंतराळ वैज्ञानिकांच्या एका टीमने २०१८ मध्ये एक थेअरी दिली होती ती म्हणजे सूर्य नष्ट झाल्यास सौरमंडळ नेबुलामध्ये बदल होईल. सूर्याचं आयुष्य जवळपास ४६० कोटी वर्ष आहे. याच काळात सौरमंडळातील अन्य ग्रह निर्माण झालेत. सर्व ग्रह आणि सूर्यावर अभ्यास केल्यानंतर माहिती मिळाली की, सूर्य पुढील १० बिलियन म्हणजे १ हजार कोटी वर्ष जिवंत राहील. सूर्याच्या मृत्यूनंतर अन्य प्रक्रियाही होतील पुढील ५०० कोटी वर्षात ही प्रक्रिया हळूहळू सुरु होईल. अखेर सूर्य एक रेड जायंट कमकुवत होऊन व्हाइट ड्वार्फ बनून राहील.

सूर्याचं केंद्र संकुचित होऊन नष्ट होईल अथवा छोटं होईल. ज्यात सूर्य उष्णता निर्माण करण्याची क्षमता संपुष्टात येईल. परंतु त्याचे बाहेरील आवरण तुटून विखुरले जातील. हे मंगळ ग्रहाच्या कक्षेपर्यंत पोहचतील. या प्रक्रियेत आपली पृथ्वीही सूर्याच्या कणामध्ये टक्कर होऊन विखुरली जाईल. परंतु सूर्य कमकुवत होताच पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्यास सुरुवात होईल. मॅग्नेटिक फिल्ड संपेल. गुरुत्वाकर्षण संपेल. अशा जीवनाची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. परंतु ही गोष्ट नक्की आहे की, सूर्य नष्ट होईल तेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी नसेल. कारण मानवी जीवसृष्टी १०० कोटी वर्षात संपेल. यापासून वाचण्याचा मार्ग म्हणजे अन्य ग्रहावर राहण्याचा मार्ग शोधणे

२०१८ मध्ये झालेल्या स्टडीत कॅम्प्युटर मॉडेलचा वापर केला होता. ९० टक्के ताऱ्यांसोबत हेच होतं. ते पहिले रेड जायंट बनतात ते नष्ट झाल्यानंतर व्हाइट ड्वार्फ बनतात. त्याचठिकाणी त्यांचा मृत्यू होतो. मॅनचेस्टर यूनिवर्सिटीचे एस्ट्रोफिजिसिस्ट अलबर्ट जिल्सट्रा यांनी सांगितले जेव्हा कुठलाही तारा नष्ट होतो तेव्हा अंतराळात मोठी घटना होते. तारा नष्ट होताना धुळ, दगड आणि गॅस निघतो. ते वेगाने आसपास पसरतो. कुठल्याही ताराचा केंद्र त्याचे जीवन निश्चित करतो. जर केंद्र कमकुवत झालं तर त्याचा अर्थ तारा आता उर्जा देऊ शकत नाही. अलबर्ट हेदेखील सूर्याच्या वयाचा शोध घेणाऱ्या टीममधील एक सदस्य आहेत.

अलबर्ट यांच्या टीममधील वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या ग्रहांच्या वयाबाबत शोध घेण्यासाठी गणितीय मॉडेल बनवलं आहे. अनेक नेबुला आहे जे आपल्याला दिसतात. तारे मेलेले असतात परंतु त्याची धुळ, गॅस आणि दगड अंतराळात पसरलेले असतात. या स्टडीत विलियम हर्सेल आणि त्यानंतर केलेल्या स्टडीजच्या आकडेवारीबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. सूर्यापासून बनलेला नेबुला केवळ १० हजार वर्षापर्यंत केवळ टेलिस्कोपच्या मदतीनं पाहता येईल. सूर्याच्या वजनाचा १.१ टक्के असलेला तारा नष्ट झाला तर तो फुसक्या बॉम्बसारखा आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या स्टडीजमुळे इतर जुन्या थेअरी फेटाळल्या आहेत. कुठल्याही तारांच्या वयाची गणना शक्य नसते. त्यात अनेक फॅक्टर्स तपासावे लागतात. वैज्ञानिकांचा डोकं फिरतं परंतु आता आम्ही सूर्य कधी नष्ट होईल हे शोधलं आहे असं अलबर्ट म्हणाले.

Web Title: Scientists Figured Out How And When Our Sun Will Die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.