ना टीव्ही माहीत होती ना युद्ध, 40 वर्षापासून घनदाट जंगलात राहत होता परिवार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:55 AM2023-08-22T10:55:26+5:302023-08-22T10:58:25+5:30

हे लोक सायबेरियातील एका जंगलात झोपडीमध्ये राहत होते. यांना वैज्ञानिकांच्या एका ग्रुपने शोधलं. ही घटना आहे 1978 मधील.

Scientists found family living forest Serbia cut off civilization did not know about tv war | ना टीव्ही माहीत होती ना युद्ध, 40 वर्षापासून घनदाट जंगलात राहत होता परिवार आणि मग...

ना टीव्ही माहीत होती ना युद्ध, 40 वर्षापासून घनदाट जंगलात राहत होता परिवार आणि मग...

googlenewsNext

ही कहाणी आहे एका अशा परिवाराची जी जगापासून फार दूर राहत होती. त्यांना काहीच माहीत नव्हतं की, जगात काय सुरू आहे. जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं तेव्हाही त्यांना याची काहीच खबर नव्हती. हे लोक सायबेरियातील एका जंगलात झोपडीमध्ये राहत होते. यांना वैज्ञानिकांच्या एका ग्रुपने शोधलं. ही घटना आहे 1978 मधील.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, त्यावेळी वैज्ञानिकांची एक टीम हेलिकॉप्टरने सायबेरियाच्या जंगलात गेली होती. त्यांचा उद्देश येथील खनिज संपत्तीची माहिती मिळवणं हा होता. हेलिकॉप्टरमधून पायलटला शहरापासून दूर 155 मैल अंतरावर एक ठिकाण दिसलं. हे ठिकाण लोकांच्या वस्तीसारखं होतं.

जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना लायकोव परिवार आढळून आला. इथे कार्प नावाच्या एक वृद्ध व्यक्ती आणि चार मुलं आढळून आलीत. त्यांची पत्नी अकुलिना यांचं 1961 मध्ये थंडी आणि उपासमारीमुळे निधन झालं होतं. त्या अशा स्थितीत 40 वर्ष जिवंत राहिल्या.  थंडीमुळे त्यांनी आपल्या शूजचं लेदरही खाल्लं होतं.

हा परिवार घनदाट जंगलात 6 हजार फूट उंचीवर एका डोंगरात सापडला. इथे सामान्यपणे अस्वल, कोल्हे आणि इतर जंगली प्राणीच जिवंत राहतात. या लोकांनी जगापासून आपला संबंध तोडला होता. त्यांनी दुसरं महायुद्ध, मून लॅंडिग्स, टीव्ही आणि आधुनिक औषधांबाबत काहीच माहीत नाही. काही अभ्यासक इथे शोधासाठी आले होते. तेव्हा त्यांना हा परिवार दिसला.

अभ्यासक म्हणाले की, कार्प घाबरलेला दिसत होता आणि सतर्क होता. आम्हाला काही बोलायचं होतं. मी सुरूवात केली आणि म्हणालो की, नमस्कार आजोबा. आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. पण त्यांनी काहीच रिप्लाय दिला नाही. नंतर आम्हाला त्यांचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले की, आता तुम्ही इतके दूर आलेच आहात तर तुमचं स्वागत आहे. 

येथील वयोवृद्ध व्यक्तीने सांगितलं की, स्टालिन असताना बऱ्याच गोष्टी वाईट होत होत्या आणि 1936 मध्ये कम्युनिस्ट लोकांनी त्यांच्या लहान भावाला गोळी मारली होती. ज्यानंतर कार्प लायकोव फ्लाइटने आपली पत्नी, 9 वर्षाचा मुलगा साविन आणि दोन  वर्षाची मुलगी नतालियासोबत इथे राहत आहे. इथे त्यांनी त्यांच्यासाठी घरं तयार केली. इथे त्यांना आणखी दोन मुले झाली. मुलांना माहीत होतं की, रशियाच्या बाहेर आणखही देश आहेत. पण त्यांना जास्त समजत नव्हतं.

अभ्यासक यांना आपल्या कॅम्पमध्ये घेऊन गेले. जेथील आधुनिक गोष्टी बघून ते हैराण झाले. 1981 मध्ये साविन आणि नतालिया यांची डाएटमुळे किडनी फेल झाली. दमित्रीचा निमोनियामुळे मृत्यू झाला. या तिघांच्या मृत्यूनंतर अभ्यासकांनी कार्पला आपली मुलगी अगाफियासोबत जंगल सोडण्यास सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. कार्प लायकोवचा 16 फेब्रुवारी 1988 मध्ये झोपेत मृत्यू झाला होता. तेच यावर्षी मार्चमध्ये अपडेट मिळाली की, अगाफिया अजूनही इथे जंगलात राहत आहे.

Web Title: Scientists found family living forest Serbia cut off civilization did not know about tv war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.