व्हेलच्या आतड्यांमध्ये सापडला 'खजिना', एका झटक्यात कोट्याधीश होऊ शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:22 PM2023-07-13T13:22:20+5:302023-07-13T13:25:45+5:30

Treasure Inside Fish Stomach: स्पेनमधील एका वैज्ञानिकांच्या ग्रुपसोबत असंच झालं आहे. त्यांना समुद्र किनारी मृत व्हेलमध्ये असं काही सापडलं ज्यामुळे ते हैराण झाले.

Scientists found rare treasure worth 44 crores inside dead whales stomach | व्हेलच्या आतड्यांमध्ये सापडला 'खजिना', एका झटक्यात कोट्याधीश होऊ शकता!

व्हेलच्या आतड्यांमध्ये सापडला 'खजिना', एका झटक्यात कोट्याधीश होऊ शकता!

googlenewsNext

Treasure Inside Fish Stomach: जर व्यक्तीचं नशीब चांगलं असेल तर कुणाच्या नशीबाला काय येईल हे काहीच सांगता येत नाही. अचानक काही लोक कोट्याधीश बनतात. काही लोकांना असं काही सापडतं ज्याचा त्यांनी कधी विचारही केलेला नसतो. स्पेनमधील एका वैज्ञानिकांच्या ग्रुपसोबत असंच झालं आहे. त्यांना समुद्र किनारी मृत व्हेलमध्ये असं काही सापडलं ज्यामुळे ते हैराण झाले.

लास पाल्मास विश्वविद्यालयात पशु स्वास्थ्य आणि खाद्य सुरक्षा संस्थेचे चीफ एंटोनियो फर्नांडीज रोड्रिग्ज यांनी मृत व्हेलच्या मृतदेहाचं परीक्षण केलं तेव्हा समजलं की, डायजेशनमध्ये समस्या असल्याने तिचा मृत्यू झाला. अशात त्यांनी व्हेल माशाचं पोट फाडून पाहिलं तर त्यांना तिच्या आतड्यांमध्ये दडलेला खजिना सापडला. जो रातोरात कुणालाही कोट्याधीश बनवू शकतो.

माशाच्या पोटातून निघाला खजिना

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रोड्रिग्जला माशाच्या आतड्यांमध्ये अडकलेला 9.5 किलोचा एक स्टेरी रंगाचा स्टोन सापडला. कुणालाही अंदाज नव्हता की, हा स्टोन म्हणजे एम्बरग्रीस आहे. ज्याची किंमती बाजारात 5.4 मिलियन म्हणजे 44 कोटी रूपयांपेक्षा जास्त असू शकते.

हा स्टोन सामान्य व्यक्तींना न मिळता वैज्ञानिकांना सापडला आहे. अशात त्याच्या खरेदीदाराचा शोध घेतला जात आहे. संस्थेने सांगितलं की, यातून मिळणारे पैसे 2021 मध्ये पाल्मावर विस्फोट झालेल्या ज्वालामुखीच्या पीडितांसाठी वापरले जातील.

का इतकं महाग आहे एम्बरग्रीस?

एम्बरग्रीस ही व्हेलची उलटी असते. हा एक कठोर मेणासारखा पदार्थ असतो. जो अनेकदा समुद्रात तरंगता सापडतो. ज्यांनाही हे सापडतं तो लगेच श्रीमंत होतो. 

व्हेल स्क्विड आणि कटलफिश खातात, ज्यातील जास्तीत जास्त भाग पचन होत नाही आणि तेच उलटीच्या माध्यमातून बाहेर येतं. अनेकदा ही उलटी आतड्यांमध्ये अडकून राहते. अशात एम्बरग्रीस आतच तयार होतं. याला समुद्रातील तरंगतं सोनं म्हटलं जातं. याचा वापर फरफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. ही गोष्ट फार दुर्मिळ आहे त्यामुळे याची किंमत बाजारात खूप जास्त आहे.

Web Title: Scientists found rare treasure worth 44 crores inside dead whales stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.