Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:29 IST2021-03-24T15:23:13+5:302021-03-24T15:29:07+5:30
वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैज्ञानिकांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले.

Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल
आइसलॅंडमध्ये ६ हजार वर्षापासून शांत असलेल्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हा नजारा बघण्यासाठी तिथे हजारो लोक येत आहेत. सोबतच अनेक वैज्ञानिकही तिथे हजर आहेत. ते ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची कारणे शोधत आहेत. यादरम्यान त्यांना भूकही लागली. तर त्यांनी बन आणि सॉसेज गरम लाव्हारसावर भाजले आणि ते खाल्ले.
वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैज्ञानिकांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले. सामान्यपणे हॉटडॉगच्या फिलिंगसाठी सॉसेज ग्रिल केले जातात. पण ते लाव्हारसावर ग्रिल करण्याची अनोखी आयडिया त्यांनी लढवली. (हे पण बघा : आइसलॅंडच्या या ज्वालामुखीमध्ये सहा हजार वर्षांनी झाला उद्रेक, बघा खास फोटो!)
Scientists take some time out studying a #volcano by grilling hot dogs on hot lava.
— Joint Cyclone Center (@JointCyclone) March 23, 2021
pic.twitter.com/0RO4SKvC7p
आइसलॅंडच्या माउंट फॅगराडेल्सफालमध्ये पहिला स्फोट चार दिवसांपूर्वी झाला होता. तेव्हापासून सतत ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर येत आहे. हा ज्वालामुखी रेकजाविक शहरापासून ३५ किमी दूर आहे. या ज्वालामुखीतून निघालेल्या लाव्हारसाी १६४० फूट उंच आकृती तयार झाली आहे.
आयसलॅंड यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मॅग्नस तुमी गडमुंडस्सन म्हणाले की, या ज्वालामुखीतून लाव्हारस येतच राहणार. होऊ शकतं की हा एका दिवसात बंद होईल नाही तर महिन्यांपर्यंत असाच राहील. पण प्रश्न हा उपस्थित राहतो की, ज्वालामुखीचा असा अचानक उद्रेक कसा झाला? आइसलॅंडमध्ये ज्वालामुखीच्या घटना नेहमीच होत राहतात. दर पाच वर्षांनी एक ज्वालामुखीचा उद्रेक होतोच. हा देश भूकंपि गतिविधींसाठी ओळखला जातो.
२०१४ पासून आतापर्यंत आइसलॅंडमध्ये दरवर्षी १ हजार ते ३ हजार भूकंप आले आहेत. पण डिसेंबर २०१९ मध्ये भूकंपाचं प्रमाण अचानक वाढलं. हेच कारण जाणून घेण्यात वैज्ञानिक बिझी आहेत. गेल्या आठवड्यात आइसलॅंडमध्ये १८ हजार भूकंप आले आहेत. ज्यात रविवारी ३ हजार भूकंप आले. यातील ४०० भूकंप हे याच ज्वालामुखीच्या भागात झाले आहेत.