२६८ वर्षांपासून जिवंत असलेला व्हेल मासा सापडला, अमेरिकेच्या इतिहासापेक्षाही २५ वर्ष आहे जुना.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:26 PM2019-12-19T12:26:17+5:302019-12-19T12:31:40+5:30
हा विचारच किती अविश्वसनिय आहे की, आपल्यात एक असा प्राणी आहे जो जवळपास तीन शतकांपासून जगत आहे'.
ऑस्ट्रेलियातील वैज्ञनिकांनी जगातली सर्वात जास्त वयाचा मासा शोधून काढलाय. या माशाचं वय साधारण २६८ वर्षे असू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, हा मासा USA च्या अस्तित्वाच्याही २५ वर्ष आधीपासून जिवंत आहे.
आतापर्यंत Bowhead Whale चं आयुष्य २११ वर्षांचं मानलं जात होतं. पण आता लागलेल्या नव्या शोधाने हे सिद्ध केलं आहे की, अनेक जलचर प्राणी हे अपेक्षा जास्त काळ जगू शकतात. Bowhead Whale आर्कटिक महासागरात आढळतात.
(Image Credit : dailymail.co.uk)
ऑस्ट्रेलियामधील वैज्ञानिकांनी Genetic Clock च्या मदतीने या व्हेलच्या जीन्सचा अभ्यास करून त्याच्या वयाबाबत माहीत मिळवली. याआधी या माशाच्या वयाचा अंदाज त्यांच्या डोळ्यातून घेतल्या गेलेल्या अमीनो अॅसिडच्या माध्यमातून घेतला जात होता.
या रिसर्चमध्ये सहभागी डॉ. Benjamin Mayne म्हणाले की, 'Vertebrates(पृष्ठवंशी प्राणी) जीवनकाळ वेगवेगळा असतो. Pygmy Goby प्रकारचा मासा हा केवळ ८ आठवडे जगतो. तर Bowhead Whale २६८ वर्षे जगू शकते. हा विचारच किती अविश्वसनिय आहे की, आपल्यात एक असा प्राणी आहे जो जवळपास तीन शतकांपासून जगत आहे'.
ते म्हणाले की, या रिसर्चच्या माध्यमातून लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचा जीव वाचवण्यास मदत मिळेल. हा रिसर्च कॅनबराच्या Commonwealth Scientific And Industrial Research Organisation च्या अभ्यासकांनी केला.