७५ हजार वर्षांपूर्वी 'असे' दिसत होते आपले पूर्वज, DNA च्या मदतीने समोर आला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:58 PM2019-09-24T12:58:10+5:302019-09-24T13:01:36+5:30
DNA कमालीची गोष्ट आहे. याच्या मदतीने अनेक आजारांची वेळेआधीच माहिती मिळवता येऊ शकते आणि याने गुन्हेगारांनाही तुरुंगात धाडण्यासही मदत मिळते.
(Image Credit : reverenceparanormal.stevesorrellphotography.com)
DNA कमालीची गोष्ट आहे. याच्या मदतीने अनेक आजारांची वेळेआधीच माहिती मिळवता येऊ शकते आणि याने गुन्हेगारांनाही तुरुंगात धाडण्यासही मदत मिळते. आता DNA च्या मदतीने वैज्ञानिकांनी आणखी एक नवं यश मिळवलं आहे. त्यांनी DNA च्या मदतीने ७५ हजार वर्षांपूर्वीच्या पूर्वजांची प्रतिमा तयार केली आहे.
हे यश इस्त्राइलच्या वैज्ञानिकांनी मिळवलं आहे. त्यांनी ७५ हजार वर्षांआधी असलेली मानवी प्रजाती Denisovans चा फोटोची प्रतिमा तयार केली आहे. Denisovans आपल्या पूर्वजांची प्रजाती आहे. जी साधारण १ लाख वर्षांआधी आशिया आणि सायबेरियामध्ये आढळत होती. यांच्याबाबत कमीच पुरावे उपलब्ध आहेत.
वैज्ञानिकांकडे यांचे तीन अवशेष होते. त्यात तीन दात, Pinky Bone आणि खालचा जबडा यांचा समावेश आहे. हे अवशेष एका मुलीचे आहेत. जे दक्षिण सायबेरियामधील डेनिसोवा नावाच्या एका गुहेत एक दशकाआधी आढळले होते.
(Image Credit : news18.com)
या अवशेषांच्या मदतीने वैज्ञानिकांनी Denisovans लोकांचा डीएनए तयार केला होता आणि हे जाणून घेण्यात यश मिळवलं की, ते कसे दिसत होते. इस्त्राइलच्या Hebrew University मध्ये हा रिसर्च करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये प्राध्यापक Liran Carmel यांचा समावेश होता.
For first time: Researchers from #Israel reconstructed look of man who became extinct 50,000 yrs ago. Team from the Hebrew University managed to put together complete anatomical profile of Denisova human based on tip of pinky finger only. pic.twitter.com/yCbuGTsJO8
— Eli Dror (@edrormba) September 19, 2019
ते म्हणाले की, 'DNA Sequences च्या मदतीने मानवाचं Anatomical Profile तयार करणं फार कठिण आहे. जर हे सोपं असतं तर पोलीस सहजपणे गुन्हेगारांना त्यांच्या डीएनएने त्यांचं प्रोफाइल तयार करून तुरूंगात टाकू शकले असते'.
(Image Credit : allthatsinteresting.com)
त्यांनी याबाबत पुढे सांगितले की, त्यांच्या टीमने तीन वर्षांपर्यंत डीएनएमध्ये झालेल्या रासायनिक बदलावर रिसर्च केला. नंतर त्यांनी Denisovans, Neanderthals आणि आधुनिक मनुष्यांच्या डीएनएशी याची तुलना केली.
या डीएनएच्या मदतीने वैज्ञानिकांनी ८६ टक्के Denisovans सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो तयार केला. वैज्ञानिकांनी सांगितले की, त्यांना हे माहीत नाही की, Denisovans लोक कसे लुप्त झालेत. पण आता ते चीनमध्ये सापडलेल्या एका मानवी कवटीवर रिसर्च करतील आणि ही कुणाची होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. ही कवटी Denisovans ची असल्याचा दावा केला जातो.