२ हजार वर्ष जुन्या पद्धतीने सर्वात बहुमूल्य अत्तर केलं तयार, इजिप्तची राणी क्लिओपात्रा करत होती याचा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:04 PM2019-08-14T17:04:38+5:302019-08-14T17:04:53+5:30
वैज्ञानिकांनी २ हजार वर्ष जुन्या प्रक्रियेचा वापर करून अशा अत्तराची निर्मिती केली आहे जे इजिप्तजी राजकुमारी क्लिओपात्रा लावत होती.
वैज्ञानिकांनी २ हजार वर्ष जुन्या प्रक्रियेचा वापर करून अशा अत्तराची निर्मिती केली आहे जे इजिप्तजी राजकुमारी क्लिओपात्रा लावत होती. नॉर्थ अमेरिकेतील दोन विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी मिळून हे अत्तर तयार केलंय. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, हे अत्तर आजच्यासारखं नाही. हे फार घट्ट आणि ऑलिव्ह ऑइलसारखं दिसतं.
वैज्ञानिकांनुसार, हे अत्तर तयार करण्यासाठी एक दशकापेक्षा जास्त वेळ लागलाय कायरोमध्ये झालेल्या या रिसर्चदरम्यान जुन्या प्रक्रियांचा अभ्यास केला गेला. अत्तर वेलची, ऑलिव ऑइल, दालचिनी आणि लोबान एकत्र करून तयार करण्यात आलं. डार्क सुगंध असलेलं हे अत्तर इतर अत्तरांच्या तुलनेत जास्त काळ टिकून राहतं.
(प्रातिनिधीक फोटो)
वैज्ञानिक प्रा. लिटमॅन म्हणाले की, दोन हजार वर्ष जुनी प्रक्रिया वापरून हे अत्तर तयार करणे आणि त्याचा सुगंध घेणं फार वेगळा अनुभव होता. हे अत्तर राजकुमारी क्लिओपात्रा करत होती. वैज्ञानिकांनी हे अत्तर इजिप्तच्या तेल-एल तिमाईमध्ये ठेवलं होतं. सध्या हे अत्तर अमेरिकेतील नॅशनल जिओग्राफी म्युझिअममध्ये प्रदर्शनासाठी ठेवलं आहे.
वैज्ञानिक एटलस ऑब्सक्यूरा म्हणाले की, कधीकाळी हे अत्तर प्राचीन जगातलं सर्वात बहुमूल्य अत्तर होतं. या अत्तराचा शोध इजिप्तमध्ये तिसऱ्या शताब्दीमध्ये लागला होता. रसायनाच्या तपासणीचं काम प्राचीन परफ्यूम प्रयोगशाळेने केले होतं. यादरम्यान हे तयार करणारे लोक परदेशातून माती मागवत होते. या मातीपासून अत्तर ठेवण्यासाठी बॉटल तयार केल्या जात होत्या. २०१२ मध्ये हे अत्तर तयार करणाऱ्या व्यक्तीच्या घराचा शोध लागला होता.
(Image Credit : news.sky.com)
जिथे हे घर सापडलं तिथे एक भट्टीही होती आणि काही सोन्या-चांदीची दागिनेही होती. असे मानले जाते की, या अत्तराच्या मोबदल्यात दागिन्यांची देवाण-घेवाण होत असावी. कॅलिफोर्नियातील परफ्यूम उद्योजक मेंडे आफटेल म्हणाले की, इजिप्तचे राजा फार वेगळ्या प्रकारच्या अत्तराचा वापर करत होते.