काय सांगता! पृथ्वीला वाचावायचंय तर मळलेले कपडे तसेच घाला, सांगतायत खुद्द संशोधक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 07:24 PM2021-09-22T19:24:54+5:302021-09-22T19:29:04+5:30

तुम्हाला माहित आहे का कपडे वारंवार धुण्यामुळे आपण पृथ्वीचं नुकसान करतोय? तज्ज्ञांनी असा सल्ला दिलाय की, पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल, तर एकदा वापरलेले कपडे, तसेच पुन्हा वापरा.

scientists says decrease use of washing machine will save earth and enviroment | काय सांगता! पृथ्वीला वाचावायचंय तर मळलेले कपडे तसेच घाला, सांगतायत खुद्द संशोधक

काय सांगता! पृथ्वीला वाचावायचंय तर मळलेले कपडे तसेच घाला, सांगतायत खुद्द संशोधक

Next

आपण नेहमी स्वच्छ धुतलेले कपडेच वापरण पसंत करतो. मात्र तुम्हाला माहित आहे का कपडे वारंवार धुण्यामुळे आपण पृथ्वीचं नुकसान करतोय? तज्ज्ञांनी असा सल्ला दिलाय की, पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल, तर एकदा वापरलेले कपडे, तसेच पुन्हा वापरा.

सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीच्या (Society of chemical industries) तज्ज्ञांनी याबाबत अहवाल सादर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग मशीनचा (Use of washing machine) वापर वाढला आहे, तेव्हापासून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून येत आहे. केवळ एकदा वॉशिंग मशीन वापरल्यावर आपण सुमारे सात लाखांहून अधिक मायक्रोस्कोपिक प्लॅस्टिक फायबर (Microscopic plastic fiber) वातावरणात सोडतो. हे प्लास्टिक फायबर खरं तर आपल्या कपड्यांमधून निघालेले असतात, जे पाण्यावाटे नदी-नाल्यांमध्ये पोहोचतात. याचा त्या स्रोतामध्ये राहणाऱ्या जलचरांवर त्याचा दुष्परिणाम होतो.

यासोबतच, कपडे वारंवार धुतल्यामुळे  त्यांची अधिक वेगाने झीज होते. त्यामुळे त्यांचं आयुष्यही कमी होतं. यामुळेच संशोधकांनी कपडे धुण्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्या कपड्यांचं आयुष्य वाढेल. तसंच पर्यावरणाचं नुकसानही बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

सस्टेनेबल क्लोदिंग ग्रुपच्या को-फाउंडर ओर्सोला डी कॅस्ट्रो यांनी सांगितलं, की आधी जेव्हा वॉशिंग मशीन्स नव्हती, तेव्हा लोकांना कपडे धुताना बऱ्याच अडचणी येत. त्यामुळे ते अगदी कमी वेळा कपडे धुवत. हीच गोष्ट आता आपण पुन्हा करायची आहे.

संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जीन्स महिन्यातून एकदाच धुण्यात (Clothes washing tips) यावी. ट्राउझर किंवा जम्पर्स सुमारे १५ दिवसांतून एकदा धुवावेत. पायजमा तुम्ही आठवड्यातून एकदा (Wear dirty clothes for environment) धुऊ शकता. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे, की जिममध्ये किंवा व्यायाम करताना वापरलेले कपडे आणि आतले कपडे दररोज धुतले गेले पाहिजेत; मात्र ते वॉशिंग मशीनमध्ये न धुता, हातानेच धुवावेत.

महिलांसाठी या रिपोर्टमध्ये विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. एक टॉप साधारणपणे पाच वेळा वापरल्यानंतर धुवावा, तसंच ड्रेसेस चार ते सहा वेळा वापरल्यानंतर धुवावेत, असे संशोधकांनी म्हटलं आहे. तसंच, महिलांनी आपली अंतर्वस्त्रे आठवड्यातून एकदा धुवावीत, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे वॉशिंग मशीनचा वापर कमी होऊन, पर्यावरणाचं नुकसान मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

Web Title: scientists says decrease use of washing machine will save earth and enviroment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.